'खरी Shiv Sena कोणाची' यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात होऊ शकते सुनावणी

Supreme Court: महाराष्ट्रात खरी शिवसेना कोणाची, यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Supreme Court
Supreme Court Dainik Gomantak

Maharashtra Politics: महाराष्ट्रात खरी शिवसेना कोणाची, यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, 'आम्ही उद्या या प्रकरणाची लिस्टिंग करु शकतो.' विशेष म्हणजे, खऱ्या शिवसेनेबाबत महाराष्ट्रात उध्दव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरु आहे. यातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात लवकरच बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत. हे पाहता खऱ्या शिवसेनेचा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी शिंदे गटाची इच्छा आहे.

सीजेआय म्हणाले

मंगळवारी ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. त्यांनी या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर CJI UU लळित आणि न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट म्हणाले की, 'आम्ही बुधवारी सुनावणीसाठी या प्रकरणाची लिस्टींग करु शकतो.'

Supreme Court
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

दुसरीकडे, CJI UU लळित पुढे म्हणाले की, 'मी स्पष्टपणे काहीही सांगू शकत नाही, परंतु उद्या काहीतरी होईल. या प्रकरणाच्या तातडीच्या सुनावणीबाबत बोलताना ज्येष्ठ वकील कौल म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले आहे. त्याचवेळी, निवडणूक आयोगात या प्रकरणाची सुनावणीही थांबवण्यात आली होती.'

हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे होते

महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने या प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे वकील कौल म्हणाले. विशेष म्हणजे, ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची याचिका पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवली होती. त्याचवेळी, या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र त्याची सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 25 ऑगस्टपर्यंत खऱ्या शिवसेनेबाबत निकाल न देण्याचे आदेशही दिले होते. स्वतःची शिवसेना खरी असल्याचा दावा करणाऱ्या शिंदे गटाच्या याचिकेवर त्यांनी हा आदेश दिला होता.

Supreme Court
Maharashtra Politics: शिंदे सरकारच्या निर्णयामुळे बीएमसीला 1000 कोटींहून अधिक नुकसान

दोन गटात संघर्ष वाढत चालला

त्याशिवाय, महाराष्ट्रात खऱ्या शिवसेनेसाठी (Shiv Sena) संघर्ष सुरु आहे. स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेणारा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट पक्षाच्या विविध परंपरांवर दावे करत आहेत. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यावरुन दोन गटात आता वर्चस्वाची लढाई सुरु आहे.

Supreme Court
Maharashtra Politics: भाजप नेते सोमय्या यांचा आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्यावर आरोप

त्याचवेळी, बीएमसी निवडणुकीबाबतचा प्रचार देखील तीव्र झाला आहे. भाजपने बीएमसीवरील शिवसेनेचे दीर्घकाळ वर्चस्व संपवण्याची तयारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हेही बीएमसी निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com