शिर्डीच्या साई संस्थानाची नवी नियमावली जाहीर

धार्मिक स्थळे उघडल्यानंतर शिर्डीच्या अर्थकारणाची चाके फिरण्यास मदत होईल
शिर्डीच्या साई संस्थानाची नवी नियमावली जाहीर
Shirdi Sai Baba Temple ReopenDainik Gomantak

देशातील सर्व भाविक भक्तांना मंदिरं सुरू होण्याची वाट होती. ती प्रतिक्षा संपत असून यंदाच्या घटनस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 7 ऑक्टोबरपासून महराष्ट्र राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

यामुळे मंदिरावर उपजीविका असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना परिस्थितीत देव तर नाही पण सरकार पावले अशी म्हणण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली आहे. कारण सरकारने निर्बंध शिथिल केल्याने विस्कटलेली आर्थिक घडी सुधारेल असा विश्वास या छोट्या व्यावसायिकांना वाटतो आहे.

Shirdi Sai Baba Temple Reopen
देवगड तटरक्षक दलाच्या रडारवर चिनी बोटी

राज्य सरकारने घटस्थापनेपासुन मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर साईभक्त , शिर्डी ग्रामस्थ आणि व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसुन आले आहे. साई मंदिर आता लवकरच सुरू होणार आहे. साई मंदिरावर शिर्डीच अर्थकारण अवलंबून असल्याने आता धार्मिक स्थळे उघडल्यानंतर शिर्डीच्या अर्थकारणाची चाके फिरण्यास मदत होईल हे मात्र निश्चित झाले. शिर्डीच्या बाजारपेठा ही खुलणार आहे. देशभरातील भाविकभक्त साईमंदिर सुरू होण्याची वाट पाहत होते. तेव्हा नव्या SOP नियमांसह साई मंदिर साई बाबांच्या दर्शनासाठी सुरू होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साई संस्थानाची नवी नियमावली जाहीर

  1. मंदिरात दररोज पंधरा हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे....

  2. दर दिवसाला 15 हजार पासेसची व्यवस्था साई संस्थांकडून करण्यात आली आहे.

  3. त्यामध्ये 5 हजार फ्री ऑनलाईन पद्धतीने पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे

  4. 5 हजार ऑफलाईन पद्धतीने (बायोमेट्रिक) पासेसची व्यवस्था संस्थेने केली आहे

  5. आणि 5 हजार पासेस सशुल्क पद्धतीने भक्तांना देण्यात येणार आहे

  6. त्याचबरोबर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता दर्शन रांगेत प्रत्येक भाविकांमध्ये 6 फुटाचे अंतर राहणार आहे

Related Stories

No stories found.