मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हाच शिवसेना संपली : नारायण राणे

केंद्रात आमचे सरकार आहे पाहू ते कोठपर्यंत उडी मारतात. असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेला दिला आहे. मी शिवसेनेला भीक घालत नाही.
शिवसेनेतून बाहेर पडलो आणि शिवसेना संपली. मी शिवसेनेला भीक घालत नाही.
शिवसेनेतून बाहेर पडलो आणि शिवसेना संपली. मी शिवसेनेला भीक घालत नाही.Twitter/@ANI

अटके संदर्भातील आदेशाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) म्हणाले, माहितीच्या आधारे मी कोणतेही उत्तर देणार नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. कोण बोलले, नाव सांगा माझी बदनामी करु नका, कोण सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) मी ओळखत नाही. तुमच्या बातमीवर मी विश्वास ठेवणार नाही. जे करता आहेत ते करु देत आम्ही पाहू. मी शिवसैनिकांना घाबरत नाहीत कोण आहेत. आदेश कोणताही काढू देत. पोलीस आयुक्त म्हणजे काय पंतप्रधान किंवा राष्ट्रपती नाहीत. माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला याची मला माहिती नाही. मी ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हाच शिवसेना (Shiv Sena) संपली. मी शिवसेनेला भीक घालत नाही.

मुख्यमंत्र्यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र दिन हे माहित नाही. ते मागे विचारतात देशाचा अमृतमोहोत्सव सोहळा माहिती नाही. हा देशाचा अपमान आहे. ज्यावेळी प्रसाद लाड यांनी शिवसेना भवना बाबत विधान केले त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी झापड लगाऊ असे म्हणले होते. त्यावेळी का गुन्हा दाखल झाला नाही. केंद्रात आमचे सरकार आहे पाहू ते कोठपर्यंत उडी मारतात. असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेला दिला आहे.

दरम्यान, अटक टाळण्यासाठी नारायण राणे हे मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे. वकिलांची टीम सध्या नारायण राणे यांच्या सोबत चर्चा केली.

कायद्यानुसार अटकेची प्रक्रिया सुरू : नाशिक पोलीस आयुक्त

नारायण राणेंना अटक होणार नाही. गुन्हयाचे गांभीर्य बघून अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले अटक करण्याचे आदेस देण्यात आहे. अटक करणे हा उद्देश नाही तर अशा वक्तव्यांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी हे आदेस काढण्यात आले कायदेशिर मार्गाने ही प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यांनी केलेल वक्तव्य न्यायालयासमोर मांडावे असे दीपक पांडे यांनी सांगितले.

राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद चिघळला

नारायण राणे यांचा राजीनामा घेऊन त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्यात यावे. अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केले आहे. शिवसैनिकांशी लढण्याची भाषा नारायण राणे आणि त्यांच्या चंगू-मंगूने करु नये. नारायण राणेंचा संयम सुटलेला आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यलयावर दगड फेक करत तोडफोड केली आहे. तर जूहूमध्ये देखील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदेलन केले. कानफाटात मारण्याची भाषा ही ठाकरी भाषा नाही. असे मुंबई महानगरपालीकेचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हणले आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे आता याचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. सांगलीत देखील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पोस्टरला काळे फसले आहे.

हे सूड बुध्दीने सुरु आहे : चंद्रकांत पाटील

हा सत्तेचा दुरुउपयोग सुरु आहे. केंद्रीय मंत्र्याला कोण्यात्याही राज्य सरकारला अटक करता येत नाही. प्रत्येक वेळेला ते कोर्टाचे फटके खातात यावेळी देखील खातील. उध्दव ठाकरे हे पंढरपूरच्या सभेत पंतप्रधानांना चोर म्हणाले त्याचे काय? राणेंना अटक करणे हे सूड बुध्दीने सुरु आहे. मी राणेंच्या वाक्याचे समर्थन करत नाही. पण ती त्यांची बोलण्याची शैली आहे.

शिवसेनेतून बाहेर पडलो आणि शिवसेना संपली. मी शिवसेनेला भीक घालत नाही.
नारायण राणे यांना अटक करण्यास नाशिक पोलीस कोकणाच्या दिशेने रवाना

राणेंवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीचीही मागणी

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वापरलेले अपशब्द म्हणजे राज्यातील जनतेचा अपमान आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याची भाषा करणे म्हणजे हा मुख्यमंत्र्यांचा नव्हे, तर राज्याच्या जनतेचा अपमान आहे. जर कोणी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन वागत असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा नवाब मलिक यांनी यावेळी घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून नारायण राणे यांच्या अटकेची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com