"...महाराष्ट्राने जिवंतपणीच श्राद्धे घातली"

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

अमित शहा यांनी यासंदर्भात बोलतांना शिवसेना आणि महाविकास आघाडीतील पक्षांवर तोफ डागली होती. मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई: महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे गृहमंत्री अमित शहा यांनी एका सभेत बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात घडलेल्या वास्तवाबाबत बोलताना, अमित शहा यांनी शिवसेनेला बंद दाराआड कोणतेही वचन दिले नसल्याचे सांगितले होते. भाजपने विधानसभेच्या निवडणुकीअगोदर मुख्यमंत्री पदासह सत्तेत पन्नास-पन्नास टक्के वाटा देण्याचे मान्य केल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. आणि त्यानंतर पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात बोलतांना शिवसेना आणि महाविकास आघाडीतील पक्षांवर तोफ डागली होती. मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

"शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली असा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो," असे म्हणत अग्रलेखातून सामनावर टीका करण्यात आली आहे. "बंद खोलीत कधीच काही करत नाही अशा गजाली त्यांनी कोकणात येऊन केल्या. त्यामुळे कुणाचे मनोरंजन झाले असेल तर माहीत नाही, पण महाराष्ट्राने या गजाली गांभीर्याने घेतल्याचे दिसत नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे." दरम्यान, आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमचे अस्तित्वच शिल्लक राहिले नसते, असे अमित शहा यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटले होते.

आता मुंबई-कोकण प्रवास करा विमानाने; चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरली -

संबंधित बातम्या