"सत्तर वर्षात केलेल्या कामांमुळेच देशाला मद्त होते आहे"

दैनिक गोमंतक
शनिवार, 8 मे 2021

शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात निर्माण झालेल्या एकूणच सर्व परिस्थितीवर जोरदार टीका केली आली आहे 

कोरोनाशी (corona) युद्ध लढण्यासाठी एकीकडे शेजारचे लहान लहान देश भारताला मदत करता आहेत, मात्र मोदी सरकार कोट्यावधी रुपयांच्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे (Central Vista Project) काम थांबविण्यास तयार नाही असे म्हणत शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यासह माजी पंतप्रधानांनी गेल्या 70 वर्षात निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे देशाला आजच्या कठीण परिस्थितीवर मात करण्यास मदत झाली असे म्हणत, शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र सामनामधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात निर्माण झालेल्या एकूणच सर्व परिस्थितीवर जोरदार टीका केली आली आहे. (Shiv Sena has said in Samana that the country is being helped only because of the work done in seventy years.)

मुंबईने कोरोनावर विजय मिळवला?; जाणून घ्या 

शिवसेनेने आपले मुखपत्र सामनाच्या माध्यमातून अशी भीती व्यक्त केली आहे की, भारतात कोरोना विषाणू ज्या वेगात पसरत आहे त्या वेगाने जगाला या विषाणूचा मोठा धोका आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत बहुतांश देशांनी भारताला मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. बांगलादेशने रेमडीसीवीरच्या 10,000 लसी  पाठवल्या आहेत तर भूतानने मेडिकल ऑक्सिजन पाठविले आहे. नेपाळ, म्यानमार आणि श्रीलंका यांनीही 'आत्मनिर्भर भारताला मदत' केली आहे असे म्हणत त्यांनी  चपराक लगावली आहे. 

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने जग हैराण झाले असून तिसरी लाट आणखी धोकादायक असणार आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पण आजही सत्ताधारी भाजप ममता बॅनर्जी याना घेरण्यात व्यस्त आहे. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोग्य मंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्याची मागणी केली आहे यावरून हे स्पष्ट आहे की केंद्रीय आरोग्य मंत्रालय ही परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहे, असे म्हणत शिवसेनेने चौफेर फटकेबाजी केली आहे. 

संबंधित बातम्या