औरंगाबाद नाही.. संभाजीनगर ! काय म्हणाले आदित्य ठाकरे..

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून महाआघाडीत सुरू असलेल्या वादावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नामांतरावर नक्कीच तोडगा निघेल, असा विश्‍वास केला आहे.

मुंबई : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून महाआघाडीत सुरू असलेल्या वादावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नामांतरावर नक्कीच तोडगा निघेल, असा विश्‍वास केला आहे. औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करत संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

सत्तेत असताना काही काम केले नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात भेट देऊन आज आदित्य ठाकरे यांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य करत भाजपला चिमटा काढला. पाच वर्षे सत्तेत असताना काही केले नाही आणि आता आरडाओरडा करत आहेत. भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली. 

 

अधिक वाचा :

राहुल गांधी, उद्धव ठाकरेंना शेतीतलं काय कळतं ?..नारायण राणेंचा घणाघात

संबंधित बातम्या