"यातच कळालं, पाणी कुठे आणि किती मुरलयं" अरविंद सावंतांचं राणेंवर टीकास्त्र

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

त्यांना हे सांगायला सव्वा वर्ष लागले. यातच कळून येते की, पाणी कुठे आणि किती मुरले ते, असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्र्यांवर  लगावला आहे. 

मुंबई: गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधूदूर्ग येथे केलेल्या भाषणाची शिवसेचे खासदार अरविंद सावंत यांनी दोरदार खिल्ली उडवली आहे. शिवसेनेला कोणतेही वचन दिले नव्हते. असे अमित शहा सांगत आहेत. त्यांना हे सांगायला सव्वा वर्ष लागले. यातच कळून येते की, पाणी कुठे आणि किती मुरले ते, असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्र्यांवर  लगावला आहे. 

त्याचबरोबर भाजप नेते नारायण राणे आयत्या बिळावर नागोबा आहेत जिथे सत्ता तिथे राणे. हिंदुत्वाचा विचार आणि तत्व अमित शहांनी ज्यांच्या व्यासपीठावरून मांडली त्यांनी सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले आहेत, अशा शब्दात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राणे आणि शहांवर टीकास्त्र  सोडले आहेत.

नारायण राणेंच्या सोबत बसलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारायला हवे होते की राणेंबाबत सभागृहात काय म्हटले होते?, नारायण राणेंनी भाजपला गुंडांचा पक्ष आहे असे म्हटले होते. त्यावर फडणवीसांनी राणे कसे गुंड आहेत हेही सांगितले होते. त्यामुळे दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले हे दिसले असल्याचे म्हणत सावंत यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला आहे.

राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले तरी काही फरक पडणार नाही, कालचा गुंड आज मंत्री कसा झाला? याचे उत्तर त्यांनाच द्यावे लागेल, असेही सावंत यांनी म्हटलेआहे.दरम्यान, माणसांना धमक्या देऊन पक्षात घ्यायचे हेच भाजपचे काम आहे असा आरोप अरविंद सावंत यांनी भाजपवर केला.

....महाराष्ट्राने जिवंतपणीच श्राद्धे घातली -

 

 

 

 

संबंधित बातम्या