
मुंबई : महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचे काल सायंकाळी निधन झालं. ते 52 वर्षांचे होते. आमदार लटके दुबईत कुटुंबियांसह फिरायला गेले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. आमदार रमेश लटके हे सलग दोन वेळचे शिवसेनेचे आमदार होते. (Shiv Sena MLA from Andheri West Ramesh Latke)
दांडगा लोकसंपर्क आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील एक मोठं नेतृत्व म्हणून आमदार लटके यांना ओळखलं जात होतं. दरम्यान त्यांच्या निधनाची माहिती शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून. त्यांचे पार्थिव लवकरच मुंबईत आणले जाणार आहे. आआणि त्या नंतर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.