रायगडावर शिवभक्त संतापले

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

रायगड किल्ल्यावर असलेले तिकीटघर शिवभक्तांनी दरीत लोटून दिले. आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाची ही तिकीट खिडकी शिवभक्तांनी गडावरून हटवली आहे.

रायगड: किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये या किल्लयाची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात रायगड ला आपल्या राज्याची राजधानी बनविली होती. शिवरायांचा शिवराज्याभिषेक रायगडावरच झाला होता. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.

रायगड किल्यावर शिवभक्त संतापले. रायगड किल्ल्यावर असलेले तिकीटघर शिवभक्तांनी दरीत लोटून दिले. आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाची ही तिकीट खिडकी शिवभक्तांनी गडावरून हटवली आहे. काल सोमवारी दुपारी चार च्या दरम्यान हा प्रसंग घडला. याप्रंसगी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष कार्यकर्त्यांनी केला. कराच्या नावाने जबरदस्ती पैशांची लूट केली जात आहे असा आरोप शिवभक्तांनी केला आहे. याप्रसंगी गडावर शिवसैनिक कार्यकर्ते आणि महाडचे आमदार भरत गोगावले उपस्थित होते.

रायगडाच्या चित्त दरवाजाजवळ महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने तिकीट घर उभारले होते. या  पुरातत्व विभागाकडून गडावर करवसुली करण्यात येत होती. रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना आणि पर्यटकांना २५ रुपये मोजावे लागत होते. परतु कर भरुन देखील रायगडावर कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने शिवभक्त संतापले. आणि सोमवारी दुपारी चारच्या सुमारास शिवसैनिकांनी आणि शिवभक्तांनी आक्रमक भूमिका घेतली. आणि चक्क गडावरच्या तिकीटघराची तोडफोड करून दरीत ढकलून देण्यात आले.

रत्नागिरीच्या कलाकाराचा सर्वात लहान रांगोळी साकारत अनोखा विश्वविक्रम -

संबंधित बातम्या