''ईडीने भाजपच्या कार्यालयात आपली शाखा सुरू केली''

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, असा उलट हल्ला ईडी आणि भाजपवर केला आहे.

मुंबई- ईडीने शिवसेनचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज छापे मारले. यावर खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, असा उलट हल्ला ईडी आणि भाजपवर केला आहे.  हिंमत असेल तर घरी या आणि अटक करून दाखवा, असेही ते यावेळी म्हणाले. ईडीने आपली शाखा भाजपच्या कार्यालयात सुरू केली, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.  

राऊत यांनी पुढे बोलताना म्हटले की, ईडी असो किंवा कोणीही असो त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखे काम करु नये. प्रताप सरनाईक हे घरी नसताना त्यांच्या घरावर टाकलेला छापा म्हणजे नामर्दानगी आहे. दिल्लीतूनच नाही तर इंटरपोलची टीम आली तरीही काही फरक पडणार आहे असे नाही. भाजपने शिखंडीसारखे ईडी किंवा सीबीआयचे बाहुले हाती धरुन कारवाई करण्यापेक्षा सरळ लढाई लढावी. तरीही आम्ही घाबरणार नसल्याचे आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे. आमच्या सर्व आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ईडीने कार्यालय थाटले तरी आम्ही घाबरत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. 
 

संबंधित बातम्या