संजय राऊत यांच्या पत्नी एक दिवस आधीच 'ईडी'च्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

गोमन्तक वृत्तसंस्था
सोमवार, 4 जानेवारी 2021

शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना काल सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. याप्रकरणी 5 जानेवारीला कार्यालयात दाखल होऊ असे सांगितले होते, मात्र त्या आज म्हणजेच एक दिवस आधी ईडी च्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्या.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना काल सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. याप्रकरणी त्यांना 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु, त्यांनी मुदतवाढ मागूव 5 जानेवारीला कार्यालयात दाखल होऊ असे सांगितले होते, मात्र त्या आज म्हणजेच एक दिवस आधी ईडी च्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्या.

पीएमसी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी काही संशयित बॅंक व्यवहार आढळून आले आहेत. त्याची पडताळणी करण्यासाठी वर्षा राऊत यांची चौकशी करणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. पीएमसी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून काही जणांची चौकशी सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचे नाव समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या