आंदोलक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला शिवसेनेचा पाठिंबा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 डिसेंबर 2020

महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेने केंद्र सरकारने केलेले नवीन शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ११ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदला काल पाठिंबा दिला आहे.

मुंबई :  महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेने केंद्र सरकारने केलेले नवीन शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ११ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदला काल पाठिंबा दिला आहे.

 

राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांनी रविवारी रात्री सांगितले की, "शिवसेना अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकरीविरोधी आणि कामगारविरोधी कायद्यांच्या विरोधात आहेत. आम्ही भारत बंदला पाठिंबा देतो". शनिवारी शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) नेते प्रेमसिंह चंदूमाजरा यांनी मुंबईत मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली होती. ठाकरे यांनी अकाली दलाच्या भूमिकेचे समर्थन केलं, असं त्यांनी सांगितले होतं. चंदुमाजरा म्हणाले की, शिक्षण, शेती आणि कायदा व सुव्यवस्था यासारख्या क्षेत्रात राज्य सरकारला असलेल्या हक्कांमध्ये मध्ये केंद्राच्या हस्तक्षेपाच्या मुद्यावर ठाकरे आपल्या पक्षाशी सहमत आहेत. राज्यांचा महसूल कमी केला जात असल्याचा आरोप करत चंदुमाजरा म्हणाले की, देशाचे राजकारण "केंद्रीकृत करण्याच्या प्रयत्नांवर" विरोध करण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.

 

मुख्यमंत्रीपदाची वाटणी करण्याच्या मुद्द्यावरून गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी संबंध तोडले होते. केंद्राच्या नव्या शेती-विषयक कायद्याच्या विरोधात शिरोमणी अकाली दल (एसएडी) सप्टेंबरमध्ये भाजपाप्रणित एनडीए सरकारमधून बाहेर पडले होते.

 

संबंधित बातम्या