कणकवलीत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध किरीट सोमैया

मात्र यावेळी सौमय्या (Kirit Somaiya) यांच्या येण्याने कणकवलीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. तूर्तास पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा वाद मिटला आहे.
कणकवलीत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध किरीट सोमैया
Kirit SomaiyaDainik Gomantak

कणकवलीत (Kankavli) आज पुन्हा एकदा भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या दौऱ्यामुळे राजकिय वातावरण ढवळून निघाले आहे. कणकवलीमधील श्रीधर नाईक चौकामध्ये शिवसेना शाखेबाहेर किरीट सौमय्या यांनी दोन वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्यावरील इडीच्या मागणीचा व्हिडिओ डिस्प्ले पुन्हा एकदा लावण्यात आला आहे. त्यातच आता सौमय्या यांचे कणकवलीच्या या चौकामध्ये जंगी स्वागत करण्यात आले. मात्र यावेळी सौमय्या यांच्या येण्याने कणकवलीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. तूर्तास पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा वाद मिटला आहे.

Kirit Somaiya
नारायण राणे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी

दरम्यान, सौमय्या कोणत्या विषयावर बोलणार याकडे कणकवलीच्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. देशामध्ये संनचयी इन्व्हेस्टमेंट हे प्रकरण मागील वर्षी चांगलंच गाजलं होतं. पुन्हा एकदा हे प्रकरण बाहेर काढण्याचे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले होते. याच पाश्भूमीवर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची थकित रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली माजी खासदार किरीट सौमय्या यांना विशेष अतिथी म्हणून बोलविण्यात आले आहे.

Kirit Somaiya
नारायण राणे यांना जामीन मंजूर

शिवाय, येथे संजीवनी गुंतवणूकदारांच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर किरीट सौमय्या संचयनी प्रकरण आणि अन्य काही प्रकरणांबाबत पुन्हा एकदा माध्यमांसमोर येणार आहे. यासंबंधीचे नियोजन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून झाले असल्याचे सांगण्यात येत आहेत. आज दुपारी शिवसेनेनेही भाजपला जशाच तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना शाखे बाहेर डिस्प्लेवर किरीट सोमैय्या यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे कुटुंबावरील याआगोदर केलेले आरोप थेटपणे जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे पुन्हा एकदा तणावाचे वातावरण होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com