धक्कादायक! लहान मुलांना पोलिओ लस म्हणून देण्यात आले सॅनिटायझर   

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

लहान मुलांना पोलिओ लस म्हणून सॅनिटायझर दिल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे.

लहान मुलांना पोलिओ लस म्हणून सॅनिटायझर दिल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. यवतमाळमध्ये 12 लहान मुलांना पोलिओची लस म्हणून सॅनिटायझर दिल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर या सर्व मुलांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. व आता त्यांची तब्येत ठीक असल्याची माहिती मिळाली आहे. 

"गोवा सरकारने कर्नाटकला म्हादई नदी विकली"

देशात काल 31 जानेवारी रोजी पोलिओ लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली होती. यावेळेस महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यात 5 वर्षाखालील 12 मुलांना पोलिओची लस देण्याऐवजी निर्जंतवणुकीकरणासाठी म्हणून वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरचे थेंब देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर पोलिओची लस म्हणून सॅनिटायझर देण्यात आलेल्या सर्व लहान बालकांना हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले होते. व आता त्यांची तब्येत ठीक असल्याचे समजते. 

दरम्यान, या घटनेनंतर आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि आशा वर्कर यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिओची लस देणारे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि आशा वर्कर यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर निष्काळजीचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आल्याची माहिती यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.    

संबंधित बातम्या