धक्कादायक! एकाच रुग्णवाहिकेतून नेले 22 मृतदेह

धक्कादायक! एकाच रुग्णवाहिकेतून नेले 22 मृतदेह
ambulance

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृतदेहासह अमानुषतेच्या घटना उघडकीस आली आहे. रुग्णवाहिकेत 22 मृतदेह एकमेकांच्यावर टाकत  स्मशानभूमीत आणण्यात आले.  नंतर एका चितेवर 2 ते 3 मृतदेह ठेवून अंत्यसंस्कार केले. या घटनेचे फोटो समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रविवारी रात्रीपर्यंत 30 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील 22 मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत आणण्यात आले, उर्वरित 8 मृतदेह दुसर्‍या रुग्णवाहिकेत आणण्यात आले. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी रुग्णालयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. (Shocking! One Ambulance carries 22 dead bodies)

रुग्णालयाकडे फक्त दोन रुग्णवाहिका 
रुग्णालयाकडे केवळ दोन रुग्णवाहिका असल्याचे रुग्णालयाने स्पष्टीकरण दिले आहे. रुग्णालयाने पाच रुग्णवाहिका मागितल्या होत्या. याबाबत 17 मार्च रोजी प्रशासनाला पत्र लिहिले गेले आहे, परंतु अद्याप रुग्णवाहिका मिळाल्या नाहीत. अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शरद जाडके म्हणाले की कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर लगेच अंतिम संस्कार करण्याचा नियम आहे. एकाच वेळी इतके शव नेण्याची परवानगी नाहीये. हे कसे घडले याचा तपास केला जात आहे.

सर्व कोविड सेन्टर फुल 
अंबाजोगाई तालुक्यातील रुग्णांची संख्या अचानक वाढल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. येथील स्वाराती रुग्णालयावरही खूप दबाव आहे. याशिवाय येथे स्थापन केलेले लोखंडी सावरगाव कोविड सेंटरही भरलेले आहे. आजूबाजूच्या तालुक्यांतील रूग्णांवरती इथेच उपचार सुरूच आहे.

काय आहे केंद्राचा प्रोटोकॉल 
1) केंद्राच्या प्रोटोकॉलनुसार कोरोना रूग्णाच्या मृत्यूच्या २ तासाच्या वाहनाने प्रशिक्षित कर्मचाऱ्यासोबत स्मशानभूमीत घेऊन जाईल.  
2) कोणालाही मृत शरीराला स्पर्श करण्याची मुभा दिली जाणार नाही.  अंत्यसंस्कारावेळी जमावालाही बंदी घातली गेली आहे. अंत्यसंस्कारानंतर   स्वच्छता  केली जाईल.
3) मृतांच्या कुटूंबाच्या उपस्थितीत 24 तासांच्या आत  मनपाच्या मदतीने रुग्णाचे अंत्यसंस्कार करावे लागतील.

Related Stories

No stories found.