सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील , कुडाळ तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटला

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील , कुडाळ तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटला
In Sindhudurg, 27 villages in Kudal taluka of the district lost contact

सिंधुदुर्ग - कोकणात ( kokan) पावसाचा जोर वाढला असून , सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे नदी, नाल्याची पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या भागातील नागरिकांचे (Citizen) जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्याचा सह्याद्री पट्यात जोर वाढत असल्याने नदीची पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आला असून तेथील ब्रिटिश कालीन माणगाव आंबेरी पुलावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. माणगाव आंबेरी, शिवापुर, गोठोस, वाडोस, तब्बल २७ गावांचा संपर्क तुटला आहे. (In Sindhudurg, 27 villages in Kudal taluka of the district lost contact)

तसेच कणकवलीतील गड नदीचा पात्र भरभरून वाहत आहे. किर्लोसवरुण दुसरीकडे जाणाऱ्या बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे बंधारवरील वाहतूक ठप्प असून सात गावांचा संपर्क तुटला आहे. या भागातील नागरिकांचे देखील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीलागत राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

मुंबई - गोवा महामार्गाच्या सर्विस रोडला धबधब्याचे स्वरूप -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावर प्रचंड प्रमाणात पाणी साचळे आहे. या पणीची विल्हेवाट लावण्यासाठी पाईपद्वारे बाहेर काढले जात आहे. 
त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गाला धबधब्याचे स्वरूप आले आहे. यामुळे कुडाळ शहराकडून मुख्य महामार्गाकडे जातांना सर्व्हिस रोडला धबधब्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे संबंधित महामार्ग प्राधिकरणावर कुडाळ नागरिकांकडून टीका होत आहेत. 

निवळी घाटात दरड कोसळून, वाहतूक ठप्प झाली - 

मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटात दरड कोसळून  महामार्गावरील दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हडवण्याचं काम सुरु आहे. सध्या त्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम सुरु आहे. पावसामुळे दरड कोसळली असून महामार्गावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे येथील वाहतूक  खोळंबली आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com