सिंधुदुर्ग विमानतळाच्या विकासकामाला वेग ; जानेवारी 2021 पर्यंत कार्यान्वित होणार

Sindhudurg Airport Will be operational by January 2021
Sindhudurg Airport Will be operational by January 2021

पणजी : केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी सिंधुदुर्ग विमानतळाच्या विकासकार्याशी संबंधित कार्यवाहीला वेग देऊन त्याबाबत सुरेश प्रभू यांना व्यक्तीश: पत्र पाठवून अवगत केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अपरिहार्य असलेले सिंधुदुर्ग विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री व जी २० साठीचे शेर्पा, सुरेश प्रभू यांनी केंद्रीय नागरी विमान मंत्री  हरदीप पुरी यांना व्यक्तिश: विनंतीपत्र पाठवले होते.

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी चिपी, सिंधुदुर्ग विमानतळाला भेट देऊन परवाना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या आयटी यंत्रणा, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचे कार्यान्वन, प्रशिक्षित अग्निशमन दल अशा काही बाबींची त्वरित पूर्तता करण्याचे निर्देश विमानतळाच्या विकासकांना दिले आहेत.  सुरेश प्रभू यांनी नागरी उड्डाणमंत्री असताना देशांतर्गत विमानवाहतूक मार्गांसाठी कार्यान्वित केलेल्या 'उडान' या योजनेअंतर्गत अलायन्स एअर या विमानकंपनीला चिपी विमानतळावरील उड्डाणांसाठी परवानगी दिली गेली आहे. चिपी, सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाचे अधिकांश काम नजीकच्या काही वर्षांमध्ये पूर्ण झालेले असून विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी जानेवारी २०२१ अखेर हे लक्ष्य ठेवले गेले आहे. सदर उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व भागधारकांशी आवश्यक तो समन्वय साधावा याकरिता केंद्रीय नागरी उड्डाण  मंत्रालयाने महाराष्ट्र राज्यशासनाला विनंती केली आहे.

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com