गोव्यातून येणाऱ्या पर्यटकांवर सिंधुदुर्ग पोलिसांची कारवाई

tourists in Amboli
tourists in Amboli

सिंधुदुर्ग: पावसाळी पर्यटनासाठी(Monsoon Tourism) प्रसिद्ध असलेला आंबोलीच्या(Amboli) धबधब्यावर(Waterfall) पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली, त्यामुळे पोलिस प्रशासन(Police) पर्यटकांवर कारवाई करतांना दिसत आहे.  गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने जाताना आंबोलीच्या मुख्य धबधब्याजवळ पर्यटनासाठी थांबून आंबोलीच्या पर्यटनाचा आल्हादायक वातावरणाचा आनंद लुटत असताना पर्यटकांवर पोलिसांची कारवाई होत आहे.

तर दुसरीकडे बेळगाव वरून खास आंबोलीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक कोकणात येत आहेत. त्यांना आंबोलीच्या पोलीस चेकपोस्टवर थांबवले जात आहे. आणि तिथूनच त्यांना माघारी पाठवले जात आहे. जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद आहेत त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनस्थळी जाऊ नये असे आव्हान सिंधुदुर्ग पोलिस प्रशासनाने केले आहे. (Sindhudurg Police are Action down on tourists in Amboli)

दरम्यान सिंधुदुर्गातील पावसाळी पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या आंबोलीचा मुख्य  धबधबा आता प्रवाहित झाला आहे. त्याच धबधब्याच्या आजुबाजूचे  लहान मोठे धबधबे सुद्धा प्रवाहित झाले आहेत. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीमध्ये सध्या निसर्गरम्य वातावरण तयार झालं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊसाची नोंद आंबोलीमध्ये पडतो त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत छोटे मोठे धबधबे मनमुराद पणे मुक्त हस्ताने आंबोलीत कोसळतात. मात्र आंबोलीतील या वर्षा पर्यटनाला यंदाही फटका बसण्याची शक्यता आहे. आंबोलीच्या पावसाळी पर्यटनाला सलग तिसऱ्या वर्षी देखील फटका बसणार असे चित्र दिसत आहे. 2019 मध्ये अतिवृष्टी, गेल्यावर्षी कोरोना आणि यंदाही कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे वर्षा पर्यटन ठप्प बसले आहे. मात्र 1 जुलैपासून आंबोलीचं पावसाळी पर्यटन सुरु करण्याची पर्यटन व्यवसायिकांची मागणी आंबोलीत जोर धरु लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com