परमबीर सिंग यांची SIT चौकशी होणार

मुंबईचे (Mumbai) माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविरूद्ध मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
परमबीर सिंग यांची SIT चौकशी होणार
Parambir SinghDainik Gomantak

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविरूद्ध मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या FIRच्या चौकशीसाठी SIT ची स्थापना करण्यात आली आहे. सध्याचे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी डीसीपी निमित गोयल यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली आहे. एसीपी स्तरीय अधिकारी या प्रकरणातील तपास अधिकारी असतील आणि त्यांच्यासमवेत assistant सहाय्यक पोलिस अधिकारी असतील. (Maharashtra SIT will investigate Parambir Singh)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरूद्ध मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला असुन खंडणी व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण 8 आरोपी आहेत, त्यापैकी 6 पोलिस आहेत. आतापर्यंत संजय पुनमिया आणि सुनील जैन या दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी मरीन ड्राईव्ह आणि ठाणे पोलिसात नोंद केलेल्या FIRमध्ये आरोपी पोलिसांच्या बदल्या केल्या आहेत. या दोन्ही प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड्सचे महानिदेशक (DG) परमबीर सिंह यांच्यासह अनेक पोलिसांवरही आरोप आहेत. आरोपी पोलिसांना मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्रास्त्र विभागात तात्पुरते तैनात केले गेले होते. या पोलिसांमध्ये EOW DCP पराग मानारे, गुन्हे शाखेचे DCP अकबर पठाण, दोन ACP आणि एक निरीक्षक यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com