दापोलीतल्या आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाले; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेले सहा पर्यटक समुद्रात बुडाले. त्यापैकी तीन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेले सहा पर्यटक समुद्रात बुडाले. त्यापैकी तीन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर उर्वरित तिघांना वाचवण्यात स्थानिका यशस्वी झाले. हे सहा जण पुण्यातून आंजर्ले येथे पर्यटनासाठी आले होते. आंजर्ले बीचवर यापूर्वीदेखाल अशा घटना घडल्या असल्याने हा समुद्रकिनारा धोकादायक असल्याचे म्हटले जाते. कोरोनामुळे गेले बरेच दिवस पर्यटनावर बंदी असल्याने हौशी पर्यटकांचा हिरमोड झाला होता. परंतु कोकण किनारपट्टी भागात कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यामुळे पर्यटनाच्या नियमांमध्ये शिथिलता आली असून, पर्यटक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत आहेत.

पुण्याचे रहिवासी असलेले सहा नागरिक फिरण्यासाठी रत्नागिरीच्या दापोलीत असलेल्या आंजर्ले समुद्रकिनारी पोहोचले. यावेळी हे सहा जण पाण्याजवळ गेले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने सहापैकी तीन जण बुडाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर स्थानिकांनी तीन जणांना पाण्यातून बाहेर काढून उपचारांसाठी दापोलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केलं आलं आहे. सर्व रहिवासी पुण्यातल्या औंधमधून आले होते. मनोज गावंडे, विकास श्रीवास्तव, उबेस खान,निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, ,रोहित पालांडे, अशी या सहा पर्यटकांची नावं आहेत.

 

 

 

संबंधित बातम्या