मुंबई आणि पुण्यासाठी धावणार दोन विशेष गाड्या, दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

प्रवाशांच्या सुविधेकरिता दक्षिण मध्य रेल्वे कडून आणखी दोन विशेष गाड्या धावणार आहे. या दोन्ही रेल्वे गाड्या संपूर्ण आरक्षित असणार आहेत.

नांदेड : प्रवाशांच्या सुविधेकरिता दक्षिण मध्य रेल्वे कडून आणखी दोन विशेष गाड्या धावणार आहे. या दोन्ही रेल्वे गाड्या संपूर्ण आरक्षित असणार आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. 

गाडी क्रमांक 07618 हुजूर साहेब नांदेड ते मुंबई छत्रपती टर्मीनन्स 26 जानेवारीपासून ते पुढील सुचना येईपर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक 07617 मुंबई छत्रपती टर्मीनन्स ते हुजुर साहेब नांदेड 27 जानेवारीपासून ते पुढील सुचना येईपर्यंत धावणार आहे. 
तपोवन एक्सप्रेस गाडी क्रमांक 07618 सकाळी 10. 05 वाजता नांदेड येथून सुटून परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबई सी. एस. एम. टी. येथे रात्री 09. 55 वाजता पोहोचणार आहे. 

गोव्यासह या आठ जिल्ह्यातील तरूणांसाठी खूशखबर... 5 ते 25 मार्चदरम्यान होणार सैन्यभरती -

तीच गाडी म्हणजे तपोवन एक्सप्रेस गाडी क्रमांक 07617 मुंबई सी. एस. एम. टी. येथून सकाळी सव्वासहा वाजता सुटून मनमाड, औरंगाबाद, परभणी मार्गे सायंकाळी सहा वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे. या गाडीला एकूण 18 डब्बे असणार आहेत .  

गाडी क्रमांक 02730 हुजूर साहेब नांदेड ते पुणे द्वी-साप्ताहिक हुजूर साहेब नांदेड येथून दर मंगळवारी आणि रविवारी 26 जानेवारीपासून ते पुढील सुचना येईपर्यंत धावणार आहे.
परत तीच गाडी क्रमांक 02729 पुणे ते हुजूर साहेब नांदेड द्वी-साप्ताहिक पुणे येथून दर बुधवारी आणि सोमवारी 27 ताखेपासून ते पुढील सुचना येईपर्यंत धावणार आहे.

पुणे एस्क्प्रेस गाडी क्रमांक 02730 नांदेड येथून रात्री 09. 30 वाजता सुटणार असून परभणी, औरंगाबाद, मनमाडमार्गे  सकाळी 09. 40 वाजता पुणे येथे पोहोचणार आहे. हीच गाडी क्रमांक 02729  पुणे एस्क्प्रेस रात्री 10.00. वाजता पुणे येथून सुटून मनमाड, औरंगाबाद, परभणी मार्गे सकाळी 10.00. वाजता नांदेड येथे  पोहोचणार आहे. या गाडीला एकूण 17 डब्बे असणार आहे. 

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड-19 संसर्गासंदर्भात वेळो-वेळी दिलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.  
 

 

संबंधित बातम्या