रत्नागिरीतील बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी धडक मोहिम सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

रत्नागिरीतील बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी विशेष मोहिम सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

रत्नागिरी : रत्नागिरातील बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी विशेष मोहिम सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. वाळू उपसा प्रकरणात गांग्राईमधील मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित करण्यात आल्याचं  जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं.

डीसी डिझाईनचा संस्थापक डिझायनर छाब्रियाला आर्थिक फसवणूकप्रकरणी अटक

रत्नागिरीत हातपाटी वाळू गटांना परवानगी असून, काही वाळू माफिया बेकायदा वाळू उपसा करत आहेत. माध्यमांनी हा मुद्दा वारंवार उचलूनही प्रशासन याविरूद्ध कठोर पावले उचलताना दिसत नाही. त्यामुळे महसुल व खाणकाम विभागाबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. माध्यमांना जो  दिसतं, ते महसुल विभागाला का दिसत नाही, असे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता, जिल्ह्यातील बेकायदा वाळू उपशाविरोधात महसुल विभागाची मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 

कोल्हापूर ते मुंबई प्रवास होणार फक्त सहा तासांत

गांग्राई येथे बेकायदा वाळू साठा जप्त केरण्यात आला आहे. जिल्ह्यात कुठेही वाळू उपसा सुरू असल्याचे कळताच आम्हाला तात्काळ सांगा,आम्ही निश्चितपणे कारवाई करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. संगमेश्‍वर आणि रत्नागिरी तालुक्‍यातील बेकायदा वाळू उपसा सुरू असलेल्या ठिकाणांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. भरारी पथकद्वारे लक्ष ठेवून कारवाई केली जाईल. कोणीही या कारवाईतून सुटू शकणार नाही, असं जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या