SSC Board : दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 10 जून 2021

राज्य मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याचे वेळापात्र जाहीर केले आहे.

कोरोनामुळे (covid-19) दहावीच्य परीक्षा (Maharashtra SSC Exam 2021) रद्द् करण्यात आल्या आहेत. यानंतर आता राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल( 10 th result) अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर होणार आहे. राज्य मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याचे वेळापात्र जाहीर केले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले (Dr. Ashok Bhosale) यांनी बुधवारी निकालाची कार्यप्रणाली जाहीर केली आहे. (SSC Board 10th results are likely in the first week of July)

विद्यार्थ्यांचे निकाल पारदर्शक होण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये 7 सदस्यीय निकाल समिती स्थापन करण्यात येणार आहे. 10 जूनला राज्यमंडळाकडून मुख्यध्यापक आणि शिक्षकांसाठी मूल्यमापनाबाबत यूट्यूबद्वारे कार्यशाळा घेण्यात येणार आहे. शिक्षक विषय निहाय गुणतक्‍ते भरून 11 ते 20 जून या काळात शाळांच्या समित्या निकाल सादर करतील. ज्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन राहिले असेल त्यांचे मूल्यमापन याच कालावधीत घेण्यात येणार आहे.मुख्याध्यापकांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार 30 जूनपर्यंत विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या सॉफ्टवेअरमध्ये सादर करायचे आहेत. यानंतर राज्य मंडळस्तरावरील प्रक्रिया 3 जुलैपासून सुरू होतील. प्रक्रिया सुरु झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.                                                      तळकोकणात" मिरग "पूजण्याची प्रथा कायम..                                    

असा लागेल विद्यार्थ्यांचा निकाल 
10 जून ला मुख्यध्यापक आणि शिक्षकांसाठी मूल्यमापनाबाबत यूट्यूबद्वारे कार्यशाळा घेण्यात येईल. 11 ते 20 जून ला न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन घेण्यात येणार आहे. 12 ते 24 जून ला वर्ग  शिक्षकांनी तयार केलेल्या निकाल ‘निकाल समितीकडे’ परीक्षणासाठी  देण्यात येईल. त्यानंतर 21 ते 30 जून ला विद्यर्थ्यांचे विषयनिहाय गुण मुख्याध्यापकांनी मंडळाच्या निकाल प्रणालीमध्ये भरावेत. 25 ते 30 जून दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल सीलबंद पाकिट करुन, 3 जुलैपर्यंत विभागीय मंडळात जमा करणे. 3 जुलैपासून विभागीय मंडळाची व राज्य मंडळाच्या स्तरावरील प्रक्रियांची कार्यवाही करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या