सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: एनसीबीचा शौविक चक्रवर्तीच्या घरावर छापा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

व्हॉट्‌सऍप संवादांमध्ये शौविक मित्रासोबत अमली पदार्थांबाबत बोलत आहे. शौविकचे हे संवाद १० ऑक्‍टोबर २०१९ चे आहेत. शौविकचा मित्र त्याला अमली पदार्थांसाठी मदत मागत आहे.

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकबाबत महत्त्वपूर्ण पुरावे, व्हॉट्‌सऍप संवादाच्या रूपाने केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एनसीबी) हाती लागले आहेत. त्यामुळे रियाचा भाऊ शौविकच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

या संवादांमध्ये शौविक मित्रासोबत अमली पदार्थांबाबत बोलत आहे. शौविकचे हे संवाद १० ऑक्‍टोबर २०१९ चे आहेत. शौविकचा मित्र त्याला अमली पदार्थांसाठी मदत मागत आहे.

संवादात हॅश, वीड व बड यांचा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यात बडची किंमत दोन ते अडीच हजार रुपये असल्याचा उल्लेखही आहे. तसेच शौविक त्याला काही अमली पदार्थांच्या व्यापाऱ्यांचे क्रमांक देत असल्याचे या संवादातून निष्पन्न झाले आहे. शेवटी मदत मागणारा मित्र अंधेरीला माल घेण्यासाठी जात असल्याचेही म्हणत आहे. त्यातील दोन व्यापाऱ्यांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या