प्रवाशांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी RTO ने लढवली अनोखी शक्कल..!

गेल्या 10 दिवसांपासून ST कर्मचारी संपावर असल्याने, प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
प्रवाशांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी RTO ने लढवली अनोखी शक्कल..!
Maharashtra: ST Bus Strike Dainik Gomantak

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून एसटी संप (ST Bus Strike) चालू आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हा संप आल्याने अनेक प्रवाश्यांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान याच परिस्थितीचा फायदा घेत अनेक खाजगी वाहनधारकांनी संधीसधुपणा केला असून प्रवासी दरात अफाट वाढ केली आहे. दरम्यान या अव्वाच्या सव्वा भाड्यावर लगाम घालण्यासाठी बीड जिल्ह्यात RTO ने अनोखी शक्कल लढवली आहे.

Maharashtra: ST Bus Strike
मुंबई करणार विक्रम! 100 टक्के लोकांना आज मिळणार लसीचा पहिला डोस

पोलिस स्वतः पुढाकार घेत खाजगी वाहनांमध्ये प्रवाशांना स्वतः बसवून देत असून, त्या प्रवाशांकडे एका चिट्टीवर आपला मोबाईल नंबर लिहून देत आहेत. दरम्यान कोणी आर्थिक लुटीचा प्रयत्न केलाच किंवा चांगली सर्विस दिली नाही तर याचा व्हाट्सअपच्या मध्यमातून फीडबॅक मागवला जात आहे. यातून एखाद्या वाहनधारकाची तक्रार आली तर संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

या नियमांमुळे बीडकर जरा निर्धास्त झाले असून नगरिकाना मोठा दिलासा मिळाला आहे. RTO पोलिसानी सामान्य नागरिकांची दखल घेतल्यामुळे नगरिकातून समाधान व्यक्त हॉट आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com