एसटी बंदमुळे टीईटी परिक्षेवर परिणाम...

विद्यार्थ्यांना (students) करावा लागला समस्यांचा सामना. अनेक विद्यार्थीना परिक्षेपासून (exam) वंचित राहण्याची भिती असल्याने करावा लागला खाजगी वाहने.
एसटी बंदमुळे टीईटी परिक्षेवर परिणाम...
TET Exam Dainik Gomantak

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या, TET शिक्षक पात्रता परीक्षेसाठी हजारो परिक्षार्थी बसले आहेत. सर्वत्र दोन सत्रात परीक्षा होत आहेत, यासाठी सकाळी आणि दुपारी परीक्षा केंद्र नेमण्यात आले आहेत. या अनुषंगाने प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. TET आणि NET एकाच दिवशी आल्याने काही परिक्षार्थीचा गोंधळ उडाला आहे. एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. तर सध्या परीक्षा केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.

तसेच, महाराष्ट्राची जीवनवाहिनी महामंडळाची ST सेवा बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नांदेड शहरातील 84 परिक्षा केंद्रावर 24,839 विद्यार्थी परिक्षा देत आहेत. याआधी TET परिक्षा चार वेळा रद्द झाली होती. अखेर ही परिक्षा आज होत असल्याचं समाधान असलं तरी अनेक विद्यार्थ्यांनी कालच परिक्षा केंद्र (Exam center) गाठून लाॅज, पर्यायी मुक्काम केला तर अनेकानी दुचाकी वर येणं पसंत केलं तर जादा पैसे देऊन प्रायव्हेट वाहनं करुन यावं लागलं आहे.

TET Exam
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढणं योग्य नाही; राजू शेट्टी

दुर्गम भागातील अनेकांना पर्यायी वाहनाची व्यवस्था नसल्याने परिक्षेत पासून वंचित ही रहावे लागले आहे. अनेक समस्या पार करुन परिक्षा केंद्रात आता कुठले विघ्न येऊ नये असे वाटत आहे. परिक्षा केंद्रावर कोव्हिड (Covid 19) नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अश्यातच अनेक परीक्षा केंद्रावर गोंधळ उडालेला पहावयास मिळत आहे. यामुळे विधार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com