1 नोव्हेंबरपासून राज्यातील महाविद्यालय सुरु: Uday Samant

प्रथमतः सीईटी परीक्षा होतील, त्यानंतरच राज्यातील महाविद्यालये (Colleges) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.
1 नोव्हेंबरपासून राज्यातील महाविद्यालय सुरु: Uday Samant
Uday SamantDainik Gomantak

मुंबई: कोरोनाचा(Covid 19) संसर्ग सुरु झाले पासून राज्यातील सर्व महाविद्यालये बंद आहेत. सर्व शाळा, महाविद्यायलात ऑनलाईन पद्धतीने (Online)शिक्षण सर्व सुरु आहे. पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंत यांनी महाविद्यालयाबद्दल मोठी घोषणा केली आहे. बंद असलेले महाविद्यालये लवकरच सुरु करण्याची परवानगी देण्यात येणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून राज्यातील महाविद्यालय सुरु होणार असं Uday Samant यांनी सांगितले.

Uday Samant
शाळा सुरु होत असेल तर कोर्ट का बंद ? ;अल्पवयीन मुलीचे सरन्यायाधीशांना पत्र

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविदलये बंद असून ऑनलाईन (Online)शिक्षणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र आता महाविद्यालये उघडण्यासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे.

उदय सामंत पुढे बोलताना म्हणाले, प्रथमतः सीईटी(CET) परीक्षा होतील. त्यानंतर महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल. सीईटी तारखा जाहीर करीत असताना उदय सामंत म्हणाले, यावर्षी सीईटीला एकूण 8 लाख 55 हजार 869 विद्यार्थी बसले आहेत. गेल्या वर्षी सीईटीसाठीची 197 केंद्रे होती. परंतु कोरोनाच्या नियमांचे पालन होण्यासाठी सीईटी केंद्रामध्ये वाढ करण्यात येत असून ती 226 केंद्रावर घेण्यात येतील. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत ही सीईटी परीक्षा घेतल्या जातील.

1 नोव्हेंबरपासून राज्यातली सर्व महाविद्यालयं सुरू कऱण्याचा विचार असून त्या पद्धतीने सर्व वाटचाली सुरु आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com