राज्य सरकारकडून शिवजयंतीसाठी नियमावली जाहीर

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

राज्यात शिवजयंती साधेपणाने करण्यात यावी यासाठी  सरकारने  नियमावली जाहीर केली आहे.

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 19 फेब्रवारीला राज्यभरात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पूर्वपदावर आलेली असली तरी ठाकरे सरकारकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात शिवजयंती साधेपणाने करण्यात यावी यासाठी  सरकारने  नियमावली जाहीर केली आहे.

नियमावली

1 राज्यात शिवजयंती एकदम साध्या पध्दतीने करण्यात यावी.

 2 येत्या 19 फेब्रवारीला किल्ल्यांवर जावून शिवजयंती साजरी करू नये.

3 सार्वजनिक ठिकाणी यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये.

 4 प्रभात फेरी, मिरवणूकांचे आयोजन करु नये.

5 महाराजांच्या स्मारकास पुष्पाहार घालताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

6 आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

ठाकरे सरकारने राज्यपालांना नाकारली विमानाची परवानगी

राज्य़ात लसीकरणाची प्रक्रीया सुरु असतानाही बुधवारी कोरोनाचे 3451 नवे रुग्ण आढळून आले. राज्यात रुग्ण ठीक होण्याचे प्रमाण 95.7 टक्के एवढे आहे. अशी माहीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

केरळमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेनचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. यामुळे राज्यसरकारने खबरदारी म्हणून केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना संबंधीत आरटी-पीसीआर चाचणी करुन यावे अशी मार्गदर्शिका जाहीर केली आहे.

संबंधित बातम्या