मोदी सरकारचा सेलिब्रेटिंवर टि्वटसाठी दबाव? राज्य सरकार करणार चौकशी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सोमवारी सांगितले की, शेतकरी चळवळीवर आंतरराष्ट्रीय व्यक्तींनी केलेल्या ट्विटला विरोध करणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियेची महाराष्ट्र सरकार चौकशी करणार आहे

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सोमवारी सांगितले की, शेतकरी चळवळीवर आंतरराष्ट्रीय व्यक्तींनी केलेल्या ट्विटला विरोध करणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियेची महाराष्ट्र सरकार चौकशी करणार आहे. प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे निवेदने प्राप्त झाले आहे. काही सेलिब्रिटींकडून 'एकाच वेळी एकच पोस्ट शेेअर केले असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत असे का घडले याचा तपास केला जाणार आहे.

भारतीय सेलिब्रिटींनी बीजेपी सरकारच्या दबावात येवून मोदी सरकारला पाठिंबा दर्शविण्यासाठी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. तेव्हा महाराष्ट्र कॉंग्रेस नेत्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आज सोमवारी कॉंग्रेस नेत्यांनी यासंदर्भात गृहमंत्र्यांसोबत ऑनलाइन बैठक घेतली होती. अनिल देशमुख यांना सध्या कोविडची लागण झाली आहे आणि ते आइसोलेशन मध्ये आहे.

ना जवान ना किसान मोदी के लिए सिर्फ उद्योगपति ही भगवान -

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना यांच्या शेतकरी चळवळीवरील ट्विटनंतर आंतरराष्ट्रीय व्यक्तींचे शेतकरी आंदोलनाविषयी ट्विटस येऊ लागले. भारतात या प्रतिक्रियांवर मोठा विरोध दर्शविण्यात आला होता. "भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही आणि आंदोलनाची स्थिती राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे." असे ट्विट भारतातील राजकारणी, अभिनेते आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी केले होते.

अंबानी अदानींच्या सरकारापेक्षा गरिबांचे सरकार केव्हाही परवडेल -

त्याच्या अधिकृत प्रतिसादामध्ये, परराष्ट्र मंत्रालयाने असा आरोप केला होता की, काही लोकांना या आंदोलनाचा स्वत:च्या स्वार्थासाठी फायदा घ्यायचा होता. अशा विषयांवर भाष्य करण्यापूर्वी वस्तुस्थितीची पडताळणी करून हे प्रकरण चांगल्याप्रकारे समजून घेणे गरजेचे आहे, अशी सूचना सरकारने केली. मंत्रालयाने याला 'सोशल मीडिया हॅशटॅग आणि कमेंट्सचा लोभ' असे म्हटले आहे. विदेशी व्यक्तींनी केलेल्या ट्विटवरून कॉंग्रेसने 'परराष्ट्र मंत्रालय अस्वस्थ का होत आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या