मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरुन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण घटना प्रकरणामध्ये माझ्या पतीचा खून झाला असावा. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
विधानसभेत देवेंद्र फडणवीस बोलत असताना, ‘’सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत का अटक करण्यात आली नाही? अशी विचारणा करताना त्यांची पाठराखण कोण करत आहे?’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीन केलेली तक्रार विधानसभेत वाचून दाखवली. ‘’26 फेब्रुवारी 2021 रोजी माझे पती चौकशीसाठी सचिन वाझे यांच्य़ासोबत गुन्हे शाखेत गेले होते. त्यानंतर 10.30 आले. दिवसभर मी सचिन वाझे यांच्यासोबत असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. 27 फेब्रुवारीला माझे पती नंतर सकाळी मुंबई गुन्हे शाखेत गेले आणि 10.30 वाजता परत आले. त्यांनतर ते पुन्हा सचिन वाझे यांच्यासोबत 28 फेब्रुवारीला गेले होते आणि जबाब नोंदवला. त्या जबाबाची एक प्रत घरी आणून ठेवण्यात आली होती. आणि त्य़ावर सचिन वाझे यांची स्वाक्षरीदेखील आहे, असं तक्रारीत नमूद असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. याचाच अर्थ असा होते की, दुसऱ्या कोणीही त्यांची चौकशी केलेली नाही. तिन्ही दिवस ते सचिन वाझे यांच्यासोबत होते.
महाराष्ट्रात या कारणांमुळे वाढला कोरोना; केंद्रीय पथकाचे राज्य सरकारला...
मनसुख हिरेन यांच्यास पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, ‘’2 मार्चला माझे पती घरी आल्यानंतर ते सचिन वाझे यांच्यासोबत मुंबई येथे गेले होते. आणि त्यांच्या सांगण्यावरुन वकिल गिरी यांच्याकडून पोलिस आणि प्रसारमाध्यमातून फोन येत असल्याची तक्रार करण्यास सांगितले होते. माझ्या पतीकडे पोलिसांनी काही मारहाण केला होती का? काही कोणी त्रास दिला होता का? याबाबत विचारणा करण्यात आली होती. यावर त्यांनी कोणीही मारहाण केली नाही आणि कोणीही त्रास दिला नसल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु चौकशी झाल्यानंतरही पोलिस वारंवार फोन करत असल्याची तक्रार दिली असल्याचे सांगितले होते’’ अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
ही परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असल्याची माझी खात्री आहे.हिरेन यांचा खून वाझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्निने केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
मनसुख हिरेन यांची गावंडेच्या परिसरात गाडीमध्ये हत्या करण्यात आल्य़ानंतर त्यांचा मृतदेह खाडीमध्य़े टाकण्यात आल्याचा आम्हांला संशय आहे. हाय टाईडमध्ये हा मृतहेह टाकला असता तर परत कधीच आला नसता. पण त्यांच्या दुर्देवाने आणि कायद्याच्या सुदैवाने त्यांचा मृतदेह लो टाईड होता आणि तो मृतदेह परत आला त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे. असही ते म्हणाले. सचिन वाझे यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.