Nanar Refinary: नाणार रिफायनरी होणारच ! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य

प्रकल्पाला कोणाचाही विरोध चालू देणार नाही, असे उत्तर नारायण राणे यांनी म्हटले आहे.
Narayan Rane
Narayan RaneDainik Gomantak

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn) गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापत असताना, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी कोकणात नाणार रिफायनरी होणारच असे वक्तव्य केले आहे. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर रिफायनरी प्रकल्पही दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो का? असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला त्यावर ठरलेल्या ठिकाणीच नाणार रिफायनरी (Nanar Refinary) होणार असून या प्रकल्पाला कोणाचाही विरोध चालू देणार नाही. असे उत्तर नारायण राणे यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना दिले.

Narayan Rane
MLA Viresh Borkar: फुटीर आमदारांविरोधात रिव्हॉल्युशनरी गोवन्स आक्रमक

मागील सात वर्षांपासून नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प चर्चेत आहे. नाणारला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प बारगळल्यानंतर हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच बारसू गाव परिसरात 13 हजार एकरवर उभारण्याचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाठवला होता. या प्रस्तावाबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

दरम्यान, 'रिफायनरीचा प्रकल्प पश्चिम किनारपट्टी किंवा दक्षिणेकडच्या राज्यात होऊ शकतो असं वक्तव्य पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी केल आहे. या प्रकल्पाबाबत राज्यांकडून किंवा गुंतवणूकदारांकडून कुठलाही स्पष्ट प्रस्ताव आलेला नाही, असंही पुरी यांनी म्हटल आहे. त्यामुळे मंत्री हरदीप पुरी आणि त्याच मंत्रीमंडळात असणारे मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याची सध्या महाराष्ट्र आणि विशेषत: कोकणात चर्चा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com