राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक; राज्यभर आंदोलन

राणे यांना कोंबडी चोर म्हणत त्यांच्या पोस्टरवर चपलांनी मारहान करतांना दिसत आहे.
शिवसेना पक्षाचे चिन्ह
शिवसेना पक्षाचे चिन्हDainik Gomantak

अटके संदर्भातील आदेशाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी मिडिसमोर येवून माहिती दिली. ते म्हणाले,माहितीच्या आधारे मी कोणतेही उत्तर देणार नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. आणि मी उत्तर देण्यास कुणाला बंधील नाही. कोण बोलले, त्याचं नाव सांगा माझी बदनामी करु नका, तुमच्या बातमीवर मी विश्वास ठेवणार नाही. जे करता आहेत ते करु देत आम्ही पाहून घेवू म्हणत मी शिवसैनिकांना घाबरत नाहीत ते कोण आहेत. असे म्हणत त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यभरात शिवसैनिकांकडून आंदोलनं केली जात आहेत. नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिक संतापले असून राज्यभरात जोरदार निदर्शने करत आहे. राणे यांना कोंबडी चोर म्हणत त्यांच्या पोस्टरवर चपलांनी मारहान करतांना दिसत आहे.

शिवसेना पक्षाचे चिन्ह
मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हाच शिवसेना संपली : नारायण राणे

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची प्रतिक्रिया

कायद्यानुसार अटकेची प्रक्रिया सुरू आहे करण्यात आली आहे. आता राणेंना अटक होणार की नाही हे सध्या निश्चित झाले नाही मात्र त्याच्या अटकेचे आदेश काढण्यात आले असे आयुक्त पांडे यांनी सांगितले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता नाशिकहून अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले. अटक करणे हा उद्देश नाही तर अशा वक्तव्यांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी हा आदेश काढण्यात आले कायदेशीर मार्गाने ही प्रक्रिया करण्यात येत आहे, असे दीपक पांडे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेसोबत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर येऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरले त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज सायंकाळी ६ वाजता पुण्यातील लोकमान्य टिळक पुतळा मंडई येथे शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करणार आहेत. युवासेना मुंबईतील राणेंच्या बंगल्यावर निदर्शने करत पुढे जातांना दिसत आहे. स्थानिक पोलिसांचा जबर बंदोबस्त राणेंच्या बंगल्याभोवत करण्यात आला आहे.

शिवसेना पक्षाचे चिन्ह
नारायण राणे यांना अटक करण्यास नाशिक पोलीस कोकणाच्या दिशेने रवाना

त्याचबरोबर औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसैनिकांनी कोंबडी घेऊन कोंबडीचोर अशा घोषणा दिल्या सोबतच नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला जोडे मारून आंदोलन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com