अजित पवारांच्या वादग्रस्त विधानामुळे बेळगाव सीमाभागात पुन्हा तणाव

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

  सीमाप्रश्‍नासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य व त्यानंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि  कन्नड संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बेळगाव :  सीमाप्रश्‍नासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य व त्यानंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि  कन्नड संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे, बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाजवळ पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी १४ नोव्हेंबर रोजी मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली. एकीकडे भाजपकडून त्याबाबत आनंदोत्सव साजरा केला जात असतानाच कन्नड संघटनांनी या प्राधिकरणालाही विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सीमाप्रश्‍नाबाबतच्या पाठपुराव्याला वेग आला आहे.

संबंधित बातम्या