कोल्हापूरात 10 दिवसांचा तर सांगलीमध्ये 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

कोल्हापूर :  कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.  उद्या (ता. 5)  सकाळी 11 पासून जिल्ह्यात पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले आहे.  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या बैठकीत आज सकाळी हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात गेल्या दिवसांत कोरोना बंधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.  जिल्ह्यातील 2400 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत.  सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव  या शेजारील जिल्ह्यांममधून कोल्हापूरला ऑक्सिजन पुरवला जात आहे. यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच निर्णय घेणीत आल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी म्हटले आहे.  (Strict lockdown of 10 days in Kolhapur and 8 days in Sangli) 

कोरोनापासून रक्षण करण्यासाठी घरातच बनवला मिनी हॉस्पिटलचा सेटअप -

खरतर, राज्यात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत ग्रामीण भागात दुसरी लाट वेगाने पसरली आहे.  त्यामुळे कोल्हापूरमध्ये 15 एप्रिल पासूनच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र नागरिक लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.  तथापि, उद्यापासून या लॉकदाऊनच्या नियमांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. यात केवळ दूध आणि भाजीपाला सुरू राहणार आहे.  जिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.  तसेच, कोरोना बंधितांची वाढती संख्या आणि त्याप्रमाणात लागणार ऑक्सिजन, व्हेंटीलेटर तुलनेने कमी आहेत. रेमडेसिव्हीरचाही तुटवडा असल्याची माहीटी देसाई यांनी दिली आहे. 

विशेष म्हणजे  सर्वोच्च न्यायालयानेही राज्यांना लॉकडाऊनचा पर्याय सुचवला आहे. तसेच, रूग्णसंख्या थांबविण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिले आहेत.  मात्र  लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना सूट देवून लॉकडाऊन कडकडीत करावा. असेही यड्रावकर यांनी नमूद केले आहे. दरम्यान आता कोल्हापूरनंतर सांगली जिल्ह्यातही पूढील 8 दिवसांचा कडक लॉकडाऊनलावण्याचा निर्णय सांगली जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 

 

संबंधित बातम्या