आयुर्वेदाचे विद्यार्थी सिंधुदुर्गात अडकले

Dainik Gomantak
गुरुवार, 7 मे 2020

या विद्यार्थ्यांच्या परिक्षांचे अर्ज भरण्याची मुदत संचारबंदीकाळातील होतो.  ऑनलाईन परिक्षा अर्ज भरण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांला  परिक्षा अर्ज अद्याप भरता आलेले नाहीत

कुडाळ

गोव्यात आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेणार्या महाराष्ट्रातील 20 विद्यार्थ्यांना लाॅकडाऊनमध्ये गोव्याबाहेर असल्याने परीक्षा अर्ज भरणे कठीण झाले आहे. त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यातील बहुतांश विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गोवा राज्यात शिरोडा येथे गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आहे. तेथिल २० विद्यार्थी संचारबंदी लागू होण्यापूर्वी पालकांना भेटण्यासाठी महाराष्ट्रात  आले  होते. परंतू त्याचवेळी संचारबंदी जाहिर झाली. त्यामुळे जिल्हा व राज्याच्या सिमा बंद करण्यात आल्या. बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांना संचारबंदी काळात गोवा येथे परतणे अशक्य झाल्याने तेथेच अडकून पडले.या विद्यार्थ्यांच्या परिक्षांचे अर्ज भरण्याची मुदत संचारबंदीकाळातील होतो.  ऑनलाईन परिक्षा अर्ज भरण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांला  परिक्षा अर्ज अद्याप भरता आलेले नाहीत. गोवा विद्यापिठाने या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन परिक्षा १ जूनपासून जाहीर केल्या आहेत. एकीकडे संपूर्ण देशात संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अडकलेल्या विद्याच्य्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांना गोव्यात  परतण्यासाठी शासनाची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे; मात्र गोवा राज्यात प्रवेश केल्यास तपासणी कालावधी तसेच संस्थात्मक विलगीकरणात रहावे लागल्यास त्याचे गोवा सरकारने जाहीर केलेले दरदिवशी प्रती व्यक्ती २५०० रुपयांचे शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारे आहे. त्यामुळे संचारबंदी काळात बाहेरगावी अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांकरीता गोवा विद्यापिठ व सरकार काय तोडगा काढणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात वैद्यकीय सेवा देणा-या या विद्याथ्यांच्या भविष्याबाबत वेळीच उचित मार्ग काढणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या