सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीच्या पॉलिग्राफ चाचणीची सीबीआय मागणी करणार?

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑगस्ट 2020

सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी गेली दोन दिवस रिया चक्रवर्तीची सीबीआय कसून चौकशी करीत आहे. याप्रकरणी सीबीआयने रियाची पॉलिग्राफ चाचणी करण्याचा विचार करत असून या संदर्भात न्यायालयाची परवानगी घेणार असल्याची माहिती सीबीआय सूत्रांनी दिली.

मुंबई: सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी गेली दोन दिवस रिया चक्रवर्तीची सीबीआय कसून चौकशी करीत आहे. याप्रकरणी सीबीआयने रियाची पॉलिग्राफ चाचणी करण्याचा विचार करत असून या संदर्भात न्यायालयाची परवानगी घेणार असल्याची माहिती सीबीआय सूत्रांनी दिली.

गेली दोन दिवस सीबीआय रियाची चौकशी करीत आहे. शुक्रवारी रियाची दहा तास चौकशी केली. मात्र तिने तपास अधिका-यांना सहकार्य केले नाही. यामुळे सीबीआयने शनिवारी पुन्हा रियाला चौकशीसाठी बोलविले. त्यानुसार दुपारी दीडच्या सुमारास ती सांताक्रुझ येथील डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये दाखल झाली. तिच्यासह सुशांतचे सीए संदीप श्रीधर यांनाही चौकशीसाठी सीबीआयने बोलावले होते. याप्रकरणी सीबीआय तिच्या पॉलिग्राफी चाचणीची मागणी न्यायालयाकडे करण्याची शक्‍यता आहे. तर दुसरीकडे रियाने स्वतः तसेच कुटुंबियांना धोका असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केल्याने, तिला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. सांताक्रुझ पोलीस रियाला सुरक्षा देणार आहेत. तिचा जबाब नोंदवण्या करता येताना घरापासून डीआरडीओ गेस्ट हाऊसपर्यंत ही सुरक्षा देण्यस सुरुवात केली आहे. रियाव्यतिरिक्त सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज सिंह, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा आणि केशव यांची देखील चौकशी केली होती. पण त्यात विशेष माहिती सापडलेली नाही. एनसीबी लवकरच रियाची चौकशी करणार आहे.

पोलिस उपायुक्‍तांना कोरोना
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिस उपायुक्‍तांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना झाल्याचा अहवाल येताच त्यांनी स्वतःला घरीच क्वारंटाईन करून घेतले आहे. शुक्रवारी (ता.२८) त्यांनी रुग्णनिवेदन देत सुटीवर गेले आहेत. सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणात हे उपायुक्त तपास करत होते. 

संबंधित बातम्या