सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकर: घराच्या तपासणीत हत्येच्या दाव्याचा पुरावा नाही

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

 सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी गेल्या चार दिवसांपासुन चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) त्याच्या घरात आत्महत्येचा घटनेच्या सत्यतेती पडताळणी करीत असताना अद्याप तरी हत्येचा दाव्याला बळकटी मिळेल, असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.

मुंबई: सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी गेल्या चार दिवसांपासुन चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) त्याच्या घरात आत्महत्येचा घटनेच्या सत्यतेती पडताळणी करीत असताना अद्याप तरी हत्येचा दाव्याला बळकटी मिळेल, असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. अधिक सखोल तपासणीसाठी न्यायवैद्यक शाळेच्या एका पथकाने देखील सीबीआयच्या सांगण्यावरुन सुशांतच्या घराची झडती घेतली आहे.

घटनास्थळावरील  सीन रिक्रेएशनमधून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. सुशांतच्या खोलीत इतर कोणत्याही मार्गातून आतमध्ये येता येऊ शकत नव्हते.यातून अशी माहिती समोर येत आहे की, सुशांतने ज्या खोलीमध्ये आत्महत्या केली होती त्या खोलीची उंची १२ फूट आहे, सुशांतची उंची पाच फुट ९ इंच होती तर त्याच्या पलंगाची उंची ४ फूट आहे. सीबीआयच्या मते हे रिक्रिएशन केल्यानंतर प्राथमिक निरिक्षणात आत्महत्या वाटत आहे. असे नाही वाटत आहे की कुणी सुशांतला मारून त्याला लटकवले असेल. मात्र सीबीआय प्रत्येक बाजूने पास करत आहे. 

सीबीआयच्या सूत्रांच्या मते, आत्महत्येवेळी खोलीचा दरवाजा आतून बंद होता आणि त्याच्या खोलीमध्ये कुणीही इतर मार्गाने आतमध्ये जाऊ शकत नाही. खिडकीतून देखील कुणी येऊ शकत नाही. 

नार्कोटिक्सची मदत घेणार
सुशांत हा ड्रग्जच्या आहारी गेला होता. त्याला दुबईच्या ड्रग्ज डिलरकडुन ड्रग्ज मिळत असल्याचा दावा एका साक्षीदाराने केला आहे. त्यामुळे या दाव्यातील सत्यता पडताळणी सुरू आहे. त्यासाठी डीलरची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून (नार्कोटिक्स) माहिती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या