मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली संशयास्पद कार; स्फोटकासह सापडली चिठ्ठी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयास्पद कार सापडल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सात जणांची चौकशी केली आहे.

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयास्पद कार सापडल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सात जणांची चौकशी केली आहे. एवढेच नव्हे तर मुंबई पोलिसांनी एंटिलियाच्या बाहेर सुरक्षा अधिक कडक केली आहे. त्याचबरोबर मुंबई क्राइम ब्रांच सीसीटीव्ही फुटेडचा तपास घेत आहे.

या संशयास्पद कारमधून जिलेटिनच्या 20 काठ्या सापडल्या आणि त्या व्यतिरिक्त काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी तक्रार दाखल केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एंटिलियाबाहेरील संशयास्पद वाहनासंदर्भात मुंबईतील गामदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणात स्फोटक पदार्थ कायदा अधिनियम 1908 च्या कलम 286, 465, 473,506(2), 120(B) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज गुन्हे शाखेकडून तपासले जात आहेत. जिलेटिन आढळणे ही एक गंभीर बाब आहे, म्हणून दहशतवादी कारवाईचा संशय वर्तविला जात असून या एंगलने तपास केला जात आहे. 

माहितीनुसार मुंबई पोलिसांनी शहरभर आपल्या कर्मचार्‍यांच्या तैनातीत वाढ केली आहे. यासह ठिकठिकाणाहूनही शोध घेण्यात येत आहे. कारच्या तपासणी दरम्यान एक पत्रही सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही गाडी  रात्री एक च्या सुमारास या ठिकाणी उभी केली असल्याचे सांगितले जात आहे.

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्कॉर्पिओ कारमध्ये 20 जिलेटिन काड्या सापडल्या. या गाडीचा वाहन क्रमांक मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेल्या वाहनाशी जुळता मिळता आहे. काल गुरुवारी रात्रीच येथे पोलिसांच्या तैनातीत वाढ करण्यात आली होती आणि एंटीलीयाबाहेर डॉग स्क्वायड पथकं तैनात करण्यात आले आहे. 

कुटुंबासाठी पठ्ठ्याने चक्क बिबट्याला केले ठार; कर्नाटकातील घटना 

 

 

संबंधित बातम्या