‘टाटा सॉल्ट लाईट’चे सर्वेक्षण: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे रागाचा पारा चढतोय

वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

कोरोनाच्या साथीमुळे अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीचा स्वीकार करावा लागला आहे. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहे. त्याचाच परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर झाला आहे

मुंबई: कोरोनाच्या साथीमुळे अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीचा स्वीकार करावा लागला आहे. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहे. त्याचाच परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर झाला आहे. विशेष म्हणजे आता मानसिक आरोग्यासंदर्भातील रुग्णसंख्येत २० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. ‘टाटा सॉल्ट लाईट’तर्फे केलेल्या सर्वेक्षणात हे स्पष्ट झाले आहे. मुंबईकरांचा राग आणि तणावही वाढल्याचे यामध्ये स्पष्ट झाले 
आहे.
सुटीच्या दिवशी काम दिले गेले किंवा शुक्रवारी एखाद्या तातडीच्या कामासाठी उशिरापर्यंत काम करण्यास सांगितले, तर खूप राग येईल,  कामात चुका होतील किंवा वरिष्ठांशी वाददेखील होतील, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे ६० टक्के व्यक्तींनी मान्य केले.सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तीनपैकी दोन व्यक्तींनी असे सांगितले, की त्यांचे वाय-फाय कनेक्‍शन किंवा इंटरनेट अचानक बंद पडले तर त्यांना राग आणि वैताग येतो. फोन चार्ज होत असताना कोणी तो काढला तर खूप राग येतो, असे  ५१ टक्के व्यक्तींनी मान्य केले.

आरोग्यदायी आहार घ्या. तुमच्या दररोजच्या जेवणात सहा धान्यांपासून बनवलेली खिचडी, विविध कडधान्यांपासून बनवलेले धिरडे किंवा घावन, कमी तेल शोषून घेणारे बेसन, लाल तांदळाचे पोहे अशा पारंपरिक भारतीय पदार्थांचा समावेश आवर्जून करा. जीवनशैलीत आरोग्याला लाभदायक ठरतील असे बदल करा.
- कविता देवगण, तज्ज्ञ, टाटा न्युट्रीकॉर्नर न्युट्रिशन
 

संबंधित बातम्या