14 फेब्रुवारी पासून मुबंई अहमदाबाद मार्गावर धावणार तेजस एक्सप्रेस 

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

 मुबंई ते अहमदाबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर.. 14 फेब्रुवारी पासून तेजस एक्सप्रेस सुरु  होणार आहे.

मुंबई: मुबंई ते अहमदाबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर.. 14 फेब्रुवारी पासून तेजस एक्सप्रेस सुरु होणार आहे. कोरोना काळात प्रवाशांकडून मिळणाऱ्या कमी प्रतिसादामुळे काही काळासाठी तेजसची सेवा बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एखदा ही सेवा सुरु करण्यात येत असून आठवड्यातून चार दिवस तेजस  धावणार आहे. लॉकडाऊनच्या काळात लांब पल्याच्या रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला फक्त श्रमिकांसाठी आणि  नंतर  विशेष रेल्वे गाड्यांची सुरुवात करण्यात आली होती.

लॉकडाऊनचे नियम  शिथील झाल्यानंतर 17 ऑक्टोबर पासून अहमदाबाद ते मुबंई तेजस एक्सप्रेस सुरु करण्यात आली होती. गुरुवार सोडून  सहा दिवस तेजस एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत होती. तसेच अंधेरी स्थानकात तेजसला थांबा सुध्दा देण्यात आला होता. सुरक्षेची खबरदारी घेऊनही तेजस एक्सप्रेसची दररोज 25 ते 40 टक्केच तिकीटे आरक्षीत होत होती. दरम्यान आयआरसीटीसीला मोठा तोटाही सहन करावा लागला होता. त्यामुळे तेजस एक्सप्रेसची सेवा 24 नोव्हेंबर 2020 पासून सेवा बंद करण्यात आली होती.

मुंबईकरांसाठी खुशखबर.. 1 फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सर्वांसाठी धावणार  

कोरोनाचं सक्रंमन कमी झाल्यामुळे मेल एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे इंडियन टूरिझम कॉरपोरेशनने तेजस एक्सप्रेस 14 फेब्रुवारी पासून पुन्हा तेजसला प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.  रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार  या  दिवशी तेजस धावणार आहे. संबंधी या गाडीची आरक्षण व्यवस्था सुरु करण्यात आली असल्याची माहिती आयआरसीटीसीने दिली आहे. मुबंई ते अहमदाबाद मार्गावर तेजस नादियाड, भरुच, सुरत, वापी, बोरिवली, अंधेरी स्थानकात तेजसला थांबा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या