मंदिरे आणि प्रार्थनास्थळे पाडव्यापासून खुली; मुख्यमंत्री म्हणाले ही तर 'श्रींची' इच्छा..!

 मंदिरे आणि प्रार्थनास्थळे पाडव्यापासून खुली; मुख्यमंत्री म्हणाले ही तर 'श्रींची' इच्छा..!
temples reopen

मुंबई-  राज्यातील मंदिरांसह इतर धर्मीयांसाची प्रार्थनास्थळे उघडण्यास महाराष्ट्र सरकारने अखेर परवानगी दिली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी हा निर्णय जाहीर केला. 

यावेळी नागरिकांना आवाहन करताना ते म्हणाले की, प्रथेप्रमाणे दिपावली सुरू झाली असून अभ्यंगस्नान आणि नरकासुराचा वधही झाला आहे. नरकासुराने चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडला असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केल्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर देव-देवतांची आणि साधू- संतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही.  एवढेच नव्हे तर इतर धर्मीयांचीनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भातही शिस्त पाळली.  

  कारण ही 'श्रींची इच्छा..... 

मागील कित्येक महिन्यांपासून सर्वच प्रार्थनास्थळे बंद आहेत. तरीही तरी डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी घेत होता. देव आपल्यातच होते. परंतु, आता पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, काटेकोर नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com