अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईतील मंदिरे आजपासून खुली; भाविकांची गर्दी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्यात आलेल्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच गर्दी करत दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत.

मुंबई- तब्बल ८ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता मंदिरातील आणि प्रार्थनास्थळांतील श्रद्धास्थानांच्या भेटी घेणे भाविकांना शक्य होणार आहे. नियम आणि अटींचे काटेकोर पालन करत ही स्थळे उघडण्यात आली आहेत. मार्चपासून बंद असलेली सर्व धार्मिक स्थळे आज भल्या पहाटे सुरू करण्यात आली. यामुळे भाविकांमध्ये आता उत्साहाची लहर येणार हे निश्चित आहे.    

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी मंदिरे खुली करत ही तर श्रींची इच्छा आहे, असे म्हटले होते. पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्यात आलेल्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच गर्दी करत दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. थर्मल स्क्रिनिंग, मास्क, सॅनिटाझर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. मंदिरांमध्ये गर्भवती महिला, लहान मुले आणी 65 वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या वृद्धांना प्रवेश मिळणार नाही. 

गेले कित्येक महिने पाहिलेल्या प्रतीक्षेनंतर आता भाविकांना आपापल्या श्रद्धास्थानांचे मुखमंडल पाहण्याचे सौख्य लाभणार असून भाविकही मोठ्या उत्साहाने मंदिरांमध्ये येत आहेत. मुंबईच्या आराध्य सिद्धीविनायक मंदिरातही आज भाविकांनी प्रचंड गर्दी करत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.  

संबंधित बातम्या