सांगलीत टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या टेम्पोमधून 12 लोक प्रवास करत होते.
सांगलीत टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
Accident Dainik Gomantak

सांगली शहरातील आयर्विन पुलावर भजनी मंडळाचा टेम्पो आणि कारची धडक झाली आहे. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 5 ते 7 लोक जखमी झाले आहेत. याचबरोबर 3 जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती समोर येत आहे. (tempo and car crash in Sangli two people died on the spot)

Accident
चार लग्नं, खोट्या केसेस आणि खंडणी! लग्नाची फसवणूक करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश

जखमींना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचले.

Accident
मुंबईत 26 मशिदीतील मुस्लिम धर्मगुरूंचा मोठा निर्णय, लाऊडस्पीकरशिवाय होणार सकाळची अजान

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या टेम्पोमधून 12 लोक प्रवास करत होते. ते सर्वजण भजनाच्या कार्यक्रमासाठी शिरोळला जात होते. अपघातात टेम्पो आणि कारच्या दर्शनी भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. टेम्पोच्या स्टेअरींगसह दरवाजा आणि इतर भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील जखमी झालेल्या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी (Doctor) दिली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) रस्ते अपघातांची मालिका सुरूच आहे. रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहतूक नियम कडक करण्याची गरज आहे, असे नागरिकांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.