मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात: वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गावात बूधवारी मोठा अपघात झाला.  आणि या अपघाता कुटूंबातील वडिलासह एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा हे गाव आहे.

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गावात बूधवारी मोठा अपघात झाला.  या अपघातात कुटूंबातील वडिलासह एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा हे गाव आहे. बुधवारच्या रात्री हा भीषण अपघात घडला. दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात एकाचा घटणास्थळीच मृत्यू झाला आहे.  ही घटना बुधवारी (ता. 27) रोजी मुंबई-गोवा महामार्गावर रात्री घडल्याचे सुत्रांनी सांगितले. झरेवाडी-रत्नागिरी येथिल राजेश महादेव धुमक (वय 34) असे मृताचे नाव आहे. राजेश धुमक पत्नी ऋतुजा राजेश धुमक (वय 30) हे दाम्पत्य आपल्या 4 वर्षाच्या मुलाला साईश धुमक घेवून रत्नागिरीतील दवाखान्यात उपचारसाठी आले होते.

दरम्यान एक आरामबस हातखंबा गावातील एका बस स्थानकाजवळ उभी होती तेव्हा मागून रत्नागिरीच्या दिशेने रस्त्याच्या उतारावरून भरधाव वेगात आलेल्या एक ट्रकचालकाने दुचाकीस्वाराला उडवले. ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवर असलेले कुटूंब दुरवर फेकले गेले त्यात त्या 4 वर्षाच्या मुलाचाही समावेश होता. हा अपघात एवढा भयंकर घडला की, ट्रकच्या धडकेत दुचाकी दोनशे मीटर फरपटत गेली होती. या अपघातात दुचाकीस्वाराची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले. तर दुचाकीस्वार राजेश धुमक यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरूद्ध निवडणुक आयुक्तांकडे तक्रार -

समाजिक कार्यकर्ते मुन्ना देसाई आणि हातखंबा गावातील तरुणांनी वेळीच बचावकार्य केले.  जखमी महिलेला आणि त्यांच्या मुलाला जगद्‌गुरु नरेंद्रचार्य महाराज या संस्थेच्या मोफत रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर अपघातात जखमी झालेल्या दोघांनाही पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेत असतांना पाली ते नाणीज दरम्यान प्रवासातच 4 वर्षाचा मुलगा साईश धुमक यांचाही मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात या भीषण अपघाताची नोंद करण्यात आली आहे.  संशयित ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात  आली आहे.

संबंधित बातम्या