मुंबई गोवा महामार्गावर शिवशाही बसची टेम्पोला धडक

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

मुंबई गोवा महामार्गावर दारु वाहतुक करणाऱ्या आयशर टेम्पोला एस टि महामंडळाच्या शिवशाही बसने मागून धडक दिल्याने हा भिषण अपघात झाला.

कणकवली (सिंधुदुर्ग) : मुंबई गोवा महामार्गावर दारु वाहतुक करणाऱ्या आयशर टेम्पोला एस टि महामंडळाच्या शिवशाही बसने मागून धडक दिल्याने हा भिषण अपघात झाला. आज सकाळी 7 च्या सुमारास झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्याजवळ आज (मंगळवारी) सकाळी ७ च्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात आयशर टेम्पो आणि शिवशाही बस अशा दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र या दोन्ही गाड्यांचा या अपघातात चक्काचूर होवून मोठे नुकसान झाले आहे.  

गोवा वन खात्याचा बेपत्ता वनरक्षक योगेश वेळीप महाराष्ट्रात सापडला 

घटनास्थळी फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. कुडाळच्या दिशेने जात असलेला हा महाराष्ट्रीयन बनावटीची अधिकृत दारू वाहतूक करणारा आयशर टेम्पो ओसरगाव येथिल टोल नाक्याजवळच्या रस्त्याकडेला उभा होता. त्याचवेळी पुण्याहून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसने नाक्यावर उभ्या असलेल्या या आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. या जोरदार धक्क्यानंतर टेम्पोतील दारूच्या बाटल्यांचे बॉक्स रस्त्यावर पडले. आणि फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा काचा रस्त्यावर पडल्या होत्या. महामार्ग वाहतूक पोलीस आणि कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेसंबधी पुढील तपास सुरु आहे. 

चीनच्या सायबर हल्ल्यामुळे मुंबईतील विजपुरवठा खंडीत? भारतीय पॉवर ग्रीडवर साधला निशाणा 

संबंधित बातम्या