गोव्यातील पर्यटनाचा आनंद घेवून परतणारी मोटार महामार्गावर पलटी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण वरचा स्टॅंड येथील उताराच्या वळणावर मोठा अपघात झाला. गाडीचा पुढचा टायर फुटल्याने मोटार पलटी झाली.

खारेपाटण (रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण वरचा स्टॅंड येथील उताराच्या वळणावर मोठा अपघात झाला. गाडीचा पुढचा टायर फुटल्याने मोटार पलटी झाली. या अपघातात आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हे सर्व रत्नागिरीतील पर्यटक असून, ते गोव्यातून रत्नागिरीला जात होते. दरम्यान सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.

गोव्यातील पर्यटनाचा आनंद घेवून तेथिल मौज मस्ती आटोपून गाडी चालकासह हे आठ जण रत्नागिरीला निघाले होते. खारेपाटण वरचा स्टॅंण्ड येथे ही गाडी आली असता. गाडीचा पुढचा टायर फुटला. त्यानंतर ही गाडी 20 फूट उजवीकडे डिव्हायडरवर जाऊन आदळली आणि पलटी झाली. या अपघातावेळी वरचा स्टॅंड येथून हायस्कूलकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. मात्र, दुसऱ्या डिव्हायडरवर जाऊन गाडी पलटल्याने  मोठा अनर्थ टळला. या अपघाता जखमी झालेल्या सर्वांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहे. अपघातावेळी वरचा स्टॅण्ड येथील रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान साधून तातडीने धाव घेतली आणि मदतकार्य केले. या कार्यकर्त्यांच्या मदतीने महामार्गावरून मोटार बाजूला करण्यात आली आणि जखमी प्रवाशांना आरेग्य केंद्रात त्वरीत उपचारासाठी दाखल करण्यात आले.

West Bengal Assembly election 2021: पश्चिम बंगालच्या वाघीणीला शिवसेनेचा पाठींबा 

संबंधित बातम्या