महाराष्ट्रातील भयानक घटना: 28 वर्षानंतर आजही तीच भीती अन् तोच भोग

कार्यालयांनी जाऊन जाऊन थकून गेलेल्या तरुणांमध्ये नैराश्य आले आहे. त्यामुळे तरुण (Youth)वर्ग व्यसनाधिन होऊन त्यांची विक्री प्रचंड प्रमाणात वाढत आहे.
महाराष्ट्रातील भयानक घटना: 28 वर्षानंतर आजही  तीच भीती अन् तोच भोग
भूकंपाचे ठिकाण Dainik Gomantak

महाराष्ट्रातील लातूर (Latur)भागात किलारी भूकंप झाल्याने लोकांच्या जीवनात संपूर्ण अंधार आला. वर्षानुवर्ष राबून कमावलेले, उभारलेले सारे क्षणार्धात मातीमोल होऊन गेले. जीवाभावाची माणसे गेली. भूकंपग्रस्तांना तत्कालीन सरकारने घरे दिली, परंतु त्याचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. ही घरे कृषी संस्कृतीला पूरक नव्हती. आज भूकंपग्रस्त भितीच्या छायेत आणि भूतकाळाच्या जखमांना ते कुरवाळत आहेत. त्यामुळे किलारी मध्ये झालेल्या भुकंपाला आता 28 वर्षं पूर्ण झाली आहेत. तरीही तीच भीती आजही लोकांच्या मनात कायम आहे.

1993 साली अतिशय दुर्दैवी (Unfortunate)घटना घडली. या भूकंपात (earthquake)वाचलेल्यांना लोकांना निवारा देण्यासाठी त्या सरकारने घरे बांधून दिली. तसेच औसा आणि उमरगा तालुक्यामध्ये तब्ब्ल 55 हजार घरे बांधण्यात आली होती. घरे दिल्याने सरकारला कर्तव्याचा आनंद झाला. परंतु या घरात राहण्याचे समाधान कुटुंब प्रमुखाला आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना कधीच लाभला नाही. वास्तवाचा विचार न करता अन् गावकऱ्यांच्या गरजा विचारात न घेता घाईगडबडीत झालेले हे पुनर्वसन भूकंपग्रस्तासाठी रोजची डोकेदुखी झाली आहे.

भूकंपाचे ठिकाण
प्रशांत महासागरातील वानुआटु बेटावर पून्हा 6.2 तीव्रतेचा भूकंप

घरासमोर ओटा, अंगण, परस, बैठकीसाठी ढेळज, धान्यासाठी लादणी, गुरासांठी गोठा, खोल्या, अशी घरे भूकंपग्रस्तांना नागरिकांना हवी होती. परंतु याचा कोणताही विचार विनिमय सरकारने केला नाही. अनेक भागात आयत्या भिंती उभारुन आणि आयत्या घरालाच तयार छत टाकून घरे बांधली गेली. या घरांमध्ये फडताळे नाही, उन्हाळ्यात उकाडा आणि हिवाळ्यात गारठा यामुळे लोकांना या कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे.

या घरावर बांधकाम कसे करायचे?

हा प्रश्न अनुत्तरीत आहे. विशेष म्हणजे बांधलेल्या बऱ्याच घरांनी दोन चार वर्षांत पाणी टपकू लागले, भिंती तडकल्या. हे घर अंगावर पडेल अन् आपला जीव जाईल, अशी भीती वाटत असल्याने अनेकांना वाटत आहे. या भीतीपोटीच अनेकांनी घरापुढे असलेल्या थोड्या-थोडक्या जागेत पत्र्याचे शेड टाकून त्यात आपली पथारी पसरली आहे. घरापासून दूरवर त्यांच्या असलेल्या शेतावर (farm)जनावराणा ठेवले आहे. तिथे जागल नसल्याने पशुधन चोरी जाण्याची भीती यामुळे शेतकऱ्यांची डोके दुखी वाढली आहे.

भूकंपाचे ठिकाण
जम्मू-काश्मीर मध्ये भूकंप,कुठलीही जीवितहानी नाही

लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये (Shopping complex)कुत्री-डूकरे राहत आहेत.तेथे अतिक्रमणही झाले आहे. रस्त्यांनी धड चालता येत नाही. भूकंप वेधशाळा, वृद्धाश्रम, वाचनालयाच्या इमारती धूळीच्या साम्राज्यात आहेत. त्या इमारतीत अवैद्य कृत्यांना ऊत आला आहे. घराचे कबाले अन कबाले अनेकांना मिळाले नाहीत. पुनर्वसनासाठी जमिनी देऊनही किलारी (Killari)भूकंप ग्रस्तांचे प्रमाणपत्र अनेक नागरिकांना मिळालेले नाहीत. कार्यालयांनी जाऊन जाऊन थकून गेलेल्या तरुणांमध्ये नैराश्य आले आहे. त्यामुळे तरुण वर्ग व्यसनाधिन होऊन त्यांची विक्री प्रचंड प्रमाणात वाढत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com