अनलॉकबाबत संभ्रमात ठाकरे सरकार

अनलॉकबाबत संभ्रमात ठाकरे सरकार
Thackeray government in confusion over lockdown

मुंबई : क्रॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्टात अनलॉक बाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. परंतु दोन तासांनी जनसंपर्क आधिकाऱ्यांनी याबाबत हात वर करत अनलॉकबाबत विचाराधीन असून अद्याप निर्बंध उठविण्यात आलेले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळेअनलॉकबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.  

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची लाट ओसरताना दिसत असून, आता अनलॉकच्या (Unlock) प्रक्रियेला राज्य सरकारकडून सुरुवात करण्यात आली आहे.  ही अनलॉकची प्रक्रिया  5 टप्प्यांत विभागण्यात आली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांत संपूर्ण अनलॉक होईल. जेथे पॉझिटिव्हीटी (Positivity) रेट 5 टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे, आणि तेथे ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत आहेत. या जिल्ह्यांतील सर्व व्यवहार उद्यापासून सुरळीत सुरु होतील. बाकीच्या ठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट जसा कमी होईल, त्यानुसार टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येईल.

सिंधुदुर्गात निर्बंध तर रत्नागिरीत कडक लॉकडउन 

कोकणातील (Kokan) सिंधुदुर्ग, रत्नागिरी तिसऱ्या टप्प्यात असून तेथे लॉकडउन कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज पासून 9 दिवस कडक लॉकडउन असेल. तर पुणे आणि रायगडला देखील लॉकडउनमधून दिलासा नाही. 

राज्यातील कोणते जिल्हे कोणत्या टप्प्यात आहेत ते पाहू 
पहिल्या टप्प्यात - ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली,  चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ
दुसऱ्या टप्प्यात - अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार
तिसऱ्या टप्प्यात - अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर 
चौथ्या टप्प्यात - पुणे, रायगड
पाचव्या टप्प्यात - उर्वरित जिल्हे

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com