ठाकरे सरकारने राज्यपालांना नाकारली विमानाची परवानगी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

उद्धव सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वादाचे पुन्हा एक नवीन प्रकरण समोर आले आहे. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देहरादूनला जाण्यासाठी शासकीय विमानाचा वापर करण्यास परवानगी दिली नाही.

मुंबई: उद्धव सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वादाचे पुन्हा एक नवीन प्रकरण समोर आले आहे. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देहरादूनला जाण्यासाठी शासकीय विमानाचा वापर करण्यास परवानगी दिली नाही. त्यानंतर त्यांना स्वतःच्या कमर्शियल प्लाइटने त्यांना आपल्या दौऱ्यावर जावे लागले. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राज्यपाल आणि उद्धव सरकार यांच्यात संघर्ष होऊ शकतो, असे मत वर्तविली जात आहेत.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज राज्य सरकारच्या विमानातून देहरादूनला जाणार होते. पण जेव्हा ते मुंबई विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, आपल्याला देहरादूनला शासकीय विमानातून जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी कमर्शियल प्लाइट बुक केली आणि ते देहरादूनला रवाना झाले. 

असेही सांगितले जात आहे की, राज्यपाल कोशियरी हे सरकारी विमानात चढले होते आणि काही काळानंतर त्यांना समजले की सरकारने त्यांना परवानगी दिली नाही. त्यानंतर त्यांना स्वतःच एक कमर्शियल फ्लाइट बुक करावी लागली.  आता या विषयावरून महाराष्ट्रातील राजकारण  तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या विषयावर भाजप उद्धव सरकारला घेरावा घालण्याचा प्रयत्न करू शकते असेही म्हटले जात आहे.

राज्यसभा: भल्या भल्यांना ठसका लावणाऱ्या मिर्चीला येणार का अच्छे दिन? -

यापूर्वीही अनेक विषयांवर राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष पाहायला मिळाले आहेत.  राज्यपाल कोटा येथून 12 एमएलसी नेमण्याच्या राज्यात मंदिर सुरू करण्याच्या निर्णयावरून सरकार आणि राज्यपाल यांच्यात गदारोळ झाला होता. 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये अनेक मुद्यांवरून तुतुमैमै झाल्याचे आपल्याला दिसून आले.

 

संबंधित बातम्या