प्राथमिक शाळा सुरु करण्याबाबत ठाकरे सरकार सकारात्मक, राजेश टोपेंची माहीती

ठाकरे सरकारला पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याबाबत टास्क फोर्सने (Task force) ग्रीन सिग्नल दिला आहे.
प्राथमिक शाळा सुरु करण्याबाबत ठाकरे सरकार सकारात्मक, राजेश टोपेंची माहीती
SchoolDainik Gomantak

महाराष्ट्रातील कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्यानंतर ठाकरे सरकारने (Thackeray Government) कोरोना नियमासंह एक एक क्षेत्रे उघडण्यास सुरुवात केली आहे. यातच आता राज्यातील शाळा (School) सुरु करण्यासाठी मागील काही दिवसांपासून शिक्षक पालकांच्या मागणीने जोर धरला होता. याचाच विचार करत आता ठाकरे सरकारला पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याबाबत टास्क फोर्सने ग्रीन सिग्नल दिला आहे. कोरोना नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्यास हरकत नसल्याचे टास्क फोर्सने (Task force) सांगितले आहे. त्याचबरोबर लांब राहून येणाऱ्या मैदानी खेळांनाही परवानगी देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितले आहे. क्रिकेट, धावण्याची शर्यतीला परवानगी देण्यात येणार आहे. परंतु खो खो आणि कब्बडीला परवानगी मिळणार नसल्याचे टास्क फोर्सने सांगितले आहे.

School
एस टी कर्मचारी आक्रमक; परिवहन मंत्र्यांच्या घरावर फेकली शाई

दरम्यान, चाईल्ड फोर्सच्या बैठकीमध्ये डॉक्टरांचे एकमत झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच गतिमंद मुलांच्या शाळाही कोरोना नियम पाळून सुरु करण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. वसतीगृहामध्ये राहणाऱ्यांची सुरुवातीला आरटीपीसीआर चाचणी करुन त्यांना शाळेत प्रवेश देण्यात येऊ शकतो असंही त्यांनी सांगितले आहे.

शिवाय, एखादा व्यक्ती पुन्हा बाहेर गेल्यास त्याला आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करणे सक्तीचे असणार आहे. केंद्राशी वार्तालाप करुन लहान मुलांच्या लसीकरणासंबंधी तत्परता ठाकरे सरकारने दाखवावी. त्याचबरोबर शाळा सुरु करुन लसीकरण केल्यास काहीच त्रास नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. राज्य टास्क फोर्सने आपला निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com